आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला !

आर्यन खान

मुंबई – क्रूझवर टाकलेल्या धाडीत अटक केलेले आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज किल्ला न्यायालयाने फेटाळले आहेत. न्यायालयाने म्हटले की, त्यांना या प्रकरणाची सुनावणी घेण्याचा आणि जामिनावर कारवाई करण्याचा अधिकार नाही. हा अर्ज सत्र न्यायालयात करायला हवा होता. त्यामुळे आर्यन आणि इतरांच्या अधिवक्त्यांनी सत्र न्यायालयात जायला हवे, असे स्पष्ट करत आर्यनची याचिका फेटाळण्यात आली.

आता आर्यन खान आणि इतर सर्व आरोपींना आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले आहे, तर मुनमुन आणि नुपूर यांना भायखळा महिला कारागृहात पाठवण्यात आले आहे.