सोलापूर येथील ‘सत्यदर्शन न्यूज चॅनल’च्या गणेशोत्सवानिमित्तच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

पूजेमध्ये श्री गणेशाची मूर्ती शक्यतो डाव्या सोंडेची का असावी ?, तसेच कोरोना संसर्गाच्या काळात विसर्जन शास्त्रानुसार कसे करावे, यांविषयी उपस्थितांना अवगत केले.

मुंबई-नागपूर ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पाच्या पाठीशी राज्य सरकार सर्वशक्तीनिशी उभी राहील ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यानंतर मराठवाड्याने मोठ्या संयमाने लढा देत मराठवाड्यालाही मुक्ती मिळवून दिली आहे, तसाच लढा कोरोनामुक्तीसाठी द्यायचा आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

कायद्याच्या दृष्टीने ‘फास्ट ट्रॅक कोर्ट’ ही संकल्पनाच अस्तित्वात नसल्याचे तज्ञांचे मत !

‘फास्ट ट्रॅक कोर्टा’मध्ये प्रलंबित खटल्यांमध्ये उत्तरप्रदेश प्रथम क्रमांकावर, तर महाराष्ट्र द्वितीय क्रमांकावर आहे. संपूर्ण देशात अशा न्यायालयांत १ लाख ६३ सहस्रांहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. असे असेल तर त्या ‘फास्ट ट्रॅक कोर्टा’चा उपयोग काय?

हवेलीच्या तहसीलदारांना लाच देणा‍र्‍या अवैध वाळू वाहतूक करणार्‍या दोघांना अटक !

अवैध धंदे चालू ठेवण्यासाठी लाच देणा‍र्‍यांना कठोर शिक्षाच व्हायला हवी !

महानगरपालिकेने नैसर्गिक जलस्रोत खुले करण्याची मागणी मान्य केली नाही ! – नरेश दहीबावकर, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती

मागील वर्षी अनेक विसर्जनस्थळांवर दुरवस्था होती. काही ठिकाणी विसर्जनाच्या वेळी मूर्तीची विटंबना झाली. त्यामुळे संतप्त भाविकांनी समितीकडे तक्रार करत कृत्रिम तलावाला विरोध दर्शवला होता.

मानाच्या पाचही गणपतींचे यंदा उत्सव मंडपासमोरच विसर्जन  !

सार्वजनिक मंडळाच्या श्री गणेशमूर्ती जागेवरच विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे. आज अनंतचतुर्दशीच्या दिवशी पुण्यातील मानाचे ५ ही गणेशमूर्तींचे विसर्जन मंडपासमोरच अगदी साधेपणाने करण्यात आले.

राज्यातील ५ महापालिका क्षेत्रांतील इयत्ता ११ वीच्या ‘ऑनलाईन’ प्रवेशाच्या ५० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त !

५ महापालिका क्षेत्रांतील एकूण १ सहस्र ४९४ महाविद्यालयांत उपलब्ध असलेल्या ५ लाख ३३ सहस्र ६७० जागांसाठी केवळ ३ लाख ८५ सहस्र ३९६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यांपैकी केवळ २ लाख १४ सहस्र ८०६ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले आहेत.

राज्य परिवहनच्या २६६ बसगाड्यांना ‘कोरोना विषाणू प्रतिबंधक ‘कोटिंग’ !

राज्य परिवहन महामंडळाने घेतलेल्या काही नवीन निर्णयामध्ये कोरोना विषाणू प्रतिबंधक कोटिंगचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत पहिला प्रयोग म्हणून २६६ बसगाड्यांना कोरोना विषाणू प्रतिबंधक कोटिंग करण्यात आले आहे.

विकासातील पोकळता !

भारताला जागतिक महासत्ता बनवण्याचे ध्येय जर समोर ठेवले असेल, तर प्राथमिक टप्प्यातील सोयीसुविधांमध्ये स्वयंपूर्ण होणे याची पूर्तता करायला हवी; कारण पाया मजबूत असेल, तर जागतिक महासत्तेचा डोलारा आपण सांभाळू शकू.

मिरज शासकीय रुग्णालयातून सातारा येथे स्थानांतरित झालेले प्राध्यापक, साहाय्यक प्राध्यापक यांचे परत मिरज येथे स्थानांतर !

आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांच्या पाठपुराव्यास यश !