वणी (यवतमाळ) तालुक्यात डेंग्यू आणि तत्सम आजारांत पुष्कळ वाढ

तालुक्यात आरोग्य कर्मचारी अल्प आहेत आणि नियोजनाच्या अभावी एका डेंग्यू रुग्णाचा मृत्यू झाल्याने चिंतेत भर पडली आहे.

थकीत वीजदेयकामुळे कराड नगरपालिकेची वीजजोडणी तोडण्यात आली !

‘‘कराड नगरपालिकेच्या ‘ड्रेनेज’ विभागाच्या ‘पंपिंग स्टेशन’चे ७ लाख ९१ सहस्र रुपयांचे वीजदेयक थकीत असल्याने कार्यालयासहित ‘पंपिंग स्टेशन’ क्रमांक ३ चीही वीजजोडणी तोडण्यात आली आहे.

नाशिक येथील मतदारसूचीत जाणीवपूर्वक दोनदा नावे ठेवणार्‍यांवर गुन्हे नोंद करणार ! – जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची चेतावणी

बनावट नावांविषयी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची शहानिशा केली जात आहे, असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.

देवतांचे विडंबन थांबवा !

हिंदु धर्मामधील देवता या तत्त्व असून त्यांची भक्ती केल्यास त्यांची कृपा होते आणि आपल्याला त्याचा लाभ होतो. हे लक्षात घेऊन देवतांचे विडंबन थांबवणे आवश्यक आहे.

याविषयी पुरो(अधो)गामी आता बोलतील का ?

केरळमधील थमारसेरी शहरातील चर्चच्या कॅटेसिस विभागाने ‘लव्ह जिहाद’विषयी जागृती करण्यासाठी एक पुस्तिका प्रसिद्ध केली आहे. यात मौलवी हे ख्रिस्ती तरुणींना ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकवण्यासाठी काळ्या जादूचा वापर करतात, असे म्हटले आहे.

अफगाणिस्तानमधील गृहयुद्ध आणि पाकिस्तानची भूमिका !

पाकिस्तानने निर्माण केलेल्या ‘हक्कानी’ या आतंकवादी गटाचा भस्मासुर त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता

हातांनी भोजन केल्याने स्वास्थ्य चांगले रहाते ! – तज्ञांचे मत

भारतीय संस्कृतीतील प्रत्येक गोष्ट मानवाला उपकारक आहे. हे पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करणार्‍यांनी लक्षात घ्यावे आणि भारतीय संस्कृतीनुसार आचरण करून जीवन सुखी करावे !

केंब्रिज विश्वविद्यालय करणार संस्कृत हस्तलिखितांचा अभ्यास !

‘संस्कृत भाषेतील प्राचीन आणि दुर्मिळ हस्तलिखितांचा अमूल्य ठेवा इंग्लंडच्या केंब्रिज विश्वविद्यालयाने त्याच्या ग्रंथालयात जतन करून ठेवला आहे.

न्यायालयात निर्दाेष; मात्र संकेतस्थळावर आरोपीच !

फौजदारी गुन्ह्यामध्ये निर्दोष सुटल्यावरही न्यायालयाच्या नोंदीमध्ये आणि ‘गूगल’सारख्या ‘सर्च इंजिन’वर त्या व्यक्तीवरील सर्व आरोपांची माहिती आढळून येते. तेथे त्याचे नाव एक आरोपी म्हणून नोंदवले गेलेले असते. त्यामुळे तो निर्दाेष असतांनाही त्याची मानहानी होते.