अवैध धंदे चालू ठेवण्यासाठी लाच देणार्यांना कठोर शिक्षाच व्हायला हवी ! – संपादक
पुणे – पोलिसांनी अवैधपणे वाळू वाहतूक करणारा पकडलेला ट्रक सोडवण्यासाठी हवेली तहसीलदारांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी दत्तात्रय पिंगळे आणि अमित कांदे या दोघांना अटक केली आहे. तहसीलदार तृप्ती पाटील यांनी ट्रक थांबवल्यावर ट्रकमालक पिंगळे यांनी कोलते यांना लाच देण्याचे आमीष दाखवले. तहसीलदारांनी त्याला नकार दिल्यावर त्यांच्या वैयक्तिक खात्यावर ‘गूगल पे’च्या साहाय्याने ५० सहस्र रुपये जमा केले होते. खडक पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. साहाय्यक पोलीस आयुक्त सीमा आडनाईक या गुन्ह्याचे पुढील अन्वेषण करत आहेत.