राज्य परिवहनच्या २६६ बसगाड्यांना ‘कोरोना विषाणू प्रतिबंधक ‘कोटिंग’ !

यवतमाळ, १९ सप्टेंबर (वार्ता.) – राज्य परिवहन महामंडळाने घेतलेल्या काही नवीन निर्णयामध्ये कोरोना विषाणू प्रतिबंधक कोटिंगचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत पहिला प्रयोग म्हणून २६६ बसगाड्यांना कोरोना विषाणू प्रतिबंधक कोटिंग करण्यात आले आहे. या कोटिंगचा परिणाम २ मासापर्यंत टिकणारा असल्याने वर्षातून ६ वेळा हे ‘कोटिंग’ करावे लागणार आहे. (यामागे कुठले ‘अर्थकारण’ नाही ना, तेही पडताळावे लागेल ! – संपादक) ‘हा निर्णय अतिशय योग्य आहे’, असे मत प्रवाशांनी नोंदवले आहे.