बेंगळुरू येथे मुसलमान महिला बँक अधिकार्‍याला मारहाण करणार्‍या दोघा धर्मांधांना अटक

सहकारी पुरुष अधिकार्‍यासमवेत दुचाकीवरून घरी जाण्यावर आक्षेप घेऊन मारहाण

हिंदूंना तालिबानी आणि असहिष्णु म्हणणारे अशा घटनांविषयी मौन का बाळगतात ? – संपादक

बेंगळुरू (कर्नाटक) – येथे एका मुसलमान महिला बँक अधिकार्‍याला आणि तिच्या सहकारी अधिकार्‍याला मारहाण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी दोघा धर्मांधांना अटक केली आहे.

३५ वर्षीय महिला अधिकार्‍याला कामावर उशीर झाल्याने तिचा सहकारी तिला दुचाकीवरून घरी सोडायला गेला होता. या महिलेने बुरखा घातला होता. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा धर्मांधांनी या अधिकार्‍यांना वाटेत रोखले आणि महिला अधिकार्‍याला पुरुष अधिकार्‍यासमेवत जाण्यावर आक्षेप घेतला. तसेच महिलेकडून तिच्या पतीचा भ्रमणभाष क्रमांक घेतला आणि त्याला याविषयी कळवले. तेव्हा पतीने त्याला या घटनेची माहिती असल्याची आणि पुरुष अधिकार्‍याला ओळखत असल्याचे सांगितले. तरीही या दोघा धर्मांधांनी या महिलेला आणि पुरुष सहकार्‍याला मारहाण केली. तसेच महिलेला रिक्शातून घरी पाठवून दिले. या घटनेचे चित्रण एका सीसीटीव्हीमध्ये झाले. त्याचा व्हिडिओ नंतर सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला होता.