भुवनेश्वर (ओडिशा) – ओडिशा उच्च न्यायालयाने नवरात्रौत्सवामध्ये श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची उंची ४ फुटांपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या राज्यशासनाच्या आदेशामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. श्री दुर्गादेवीची ८ फुटांपर्यंतची मूर्ती बनवण्याची मागणी करणारी याचिका बालू बाजार पूजा कमिटीकडून न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला.
Orissa HC rejects plea on raising height of Durga idol to 4 feet, says move will not affect sanctity https://t.co/dB0ezd9evm
— Hindustan Times (@HindustanTimes) September 17, 2021
न्यायालयाने म्हटले की, गेल्या वर्षी राज्यशासनाने मूर्तीची उंची मर्यादित ठेवण्याचा आदेश उशिरा जारी केला होता. तोपर्यंत अनेक पूजा समित्यांकडून मूर्ती बनवण्यात आल्या होत्या. त्यामुळे ४ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तींना अनुमती देण्यात आली होती. यावर्षी मात्र शासनाने ऑगस्ट मासामध्येच आदेश दिला आहे. त्यामुळे सूट देता येणार नाही.