पूज्य (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज यांनी मनुष्य आणि मनुष्यजन्म यांविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !
‘माणसाला जेवढे रोग होत आहेत, तेवढेच रानावनात रहाणार्या पशूपक्ष्यांनाही होतात. त्यांनाही सर्दी आणि ताप असे रोग होतात; परंतु त्यांना कुणी वैद्यांकडे नेतात का ? ते आपोआपच बरे होतात, तर काही मरतात. त्याचप्रमाणे माणसेही वैद्यांकडे गेली, तरी त्यांतील काही मरतात.