हिंदूंच्या देवतांच्या प्रतिकांना विरोध करण्यात दलितांनी वेळ न घालवता स्वतःचे प्रश्न सोडवण्याकडे लक्ष केंद्रित करावे ! – डॉ. शरणकुमार लिंबाळे
डॉ. लिंबाळे या वेळी म्हणाले, ‘‘दलित आणि सवर्ण यांच्यात दरी निर्माण झाली असून ती दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. दलितांचे प्रश्न दलितांनीच सोडवावेत, असे नाही, तर सवर्णांनीही ते सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.