मालवण शहरासह ग्रामीण भागात लहान मुलांचे सर्वेक्षण करणार्‍या गटाला पोलिसांनी समज देऊन सोडले

प्रातिनिधिक छायाचित्र

मालवण – लहान मुलांचे सर्वेक्षण करण्यासाठी मालवण शहरासह ग्रामीण भागात फिरणार्‍या एका तरुण-तरुणींच्या गटाची पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर त्यांची साक्ष नोंदवून तालुक्यात कोणताही आरोग्यविषयक कार्यक्रम करण्यापूर्वी आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन यांना माहिती द्यावी, अशी समज देऊन सोडून देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक एस्.एस्. ओटवणेकर यांनी दिली.

तालुक्यातील देवबाग येथे तरुण-तरुणी यांचा एक गट घरोघरी जात असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. त्यामुळे स्थानिकांनी याविषयी पोलिसांना माहिती दिली अन् या गटाला पोलिसांच्या कह्यात दिले. त्या गटाकडे असलेल्या कागदपत्रांची पोलिसांनी वैद्यकीय अधीक्षक बालाजी पाटील यांच्या उपस्थितीत तपासणी केली. त्यानंतर गटातील सर्वांचे म्हणणे नोंदवून (जबाब नोंदवून) आणि समज देऊन त्यांना सोडण्यात आले.