संस्कृत दिनानिमित्त आज ‘गुगलमीट’द्वारे संस्कृत सुभाषित कार्यशाळेचे आयोजन

सावंतवाडी – २२ ऑगस्टला असलेल्या संस्कृत दिनानिमित्त ‘आचार्य इन्स्टिट्यूट ऑफ संस्कृत अँड योग’, या संस्थेच्या वतीने २१ ऑगस्ट या दिवशी ‘संस्कृत सुभाषित कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभाग घेण्याविषयी आवाहन करण्यात आले आहे. सुनियोजित सर्व बालबोध अभ्यासक्रमातील सुभाषिते, सरळ सोप्या पद्धतीने संस्कृत अर्थ ज्ञान, संस्कृत सुभाषिते उच्चारण तथा पाठांतर पद्धत, सुभाषितांच्या सरळ चाली, असे विषय कार्यशाळेत घेतले जाणार आहेत. २१ ऑगस्ट या दिवशी सकाळी १० ते ११ आणि संध्याकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. कार्यशाळा ‘गूगलमीट’द्वारे होणार असून meet.google.com/ixp-mask-iso या लिंकवर क्लिक करून सहभागी होता येणार आहे. याविषयी अधिक माहितीसाठी संस्कृत विभूषण व्याकरणाचार्य हरिश्चंद्र यांच्याशी ९४०५५७५६८० किंवा ९२८४३४५६२५ या भ्रमणभाषवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.