कोरोनाच्या वैश्विक महामारीच्या काळात नि:स्वार्थ भावाने साहाय्य करण्याची आवश्यकता असतांना या काळात ‘हिंदूंचे धर्मांतर करणे, ही एक मोठी संधी आहे’, असे धर्मांतर करणारे मानत आहेत आणि तसा प्रयत्नही ते करत आहेत. कोरोना संकटकाळातही ख्रिस्त्यांनी धर्मांतर करणे, हा मानवतेसाठी सर्वांत मोठा कलंक आहे. येथे कुणीही स्वतःहून धर्मांतरित झाले नाही; कारण येथील संस्कृती आणि धर्म महान आहे. नैसर्गिक आपत्ती, युद्ध, नक्षलवाद चालू राहिल्यास हिंदूंचे धर्मांतर चालूच राहील, हीच इच्छा धर्मांतर करणारे ख्रिस्ती मिशनरी बाळगून आहेत. हिंदूंच्या देवतांविषयी घृणा निर्माण करून आणि ‘ख्रिस्ती पंथ आचरणात आणून येशूचे नाव घेतल्यावर कोरोना तुमचे काही बिघडवू शकत नाही’, असे सांगत ख्रिस्ती मिशनरी धर्मांतर करत आहेत. नागरिकांना आरोग्याची भीती दाखवून त्यांचे धर्मांतर केले जात आहे.