मुसळधार पावसामुळे मुंबईमध्ये रेल्वेसेवा काही काळ ठप्प

पाऊस अल्प झाल्यावर मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक चालू करण्यात आली. १६ जुलैला सायंकाळनंतर पुन्हा मुसळधार पावसाला प्रारंभ झाला होता.

कोयना पर्यटन विकासासाठी ७१ लाख रुपयांचा निधी !

कोयनेच्या १० किलोमीटर परिसरातील प्रेक्षणीय ठिकाणे विकसित करण्याचा आराखडा सिद्ध केला असून त्यासाठी २८ कोटी रुपयांचा निधी संमत झाला आहे.

मुसलमान आणि ब्रिटीश राजवटीतही पंढरपूरच्या वारीत खंड पडला नव्हता ! – विश्व हिंदु परिषद

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रत्येक दिंडीतील २ वारकर्‍यांना पायी जाण्यास अनुमती देण्याची विश्व हिंदू परिषदेची मागणी

नागपूर येथे कोरोनाच्या कारणामुळे यंदाही ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या गणेशमूर्तीवरील बंदीला स्थगिती !

‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तीमुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी गेल्या १० वर्षांपासून प्रयत्न चालू आहेत. वर्ष २०१० मध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने या संदर्भातील बंदीविषयी मार्गदर्शक तत्त्वे घोषित केली होती; मात्र मूर्तीकारांनी त्याला विरोध दर्शवला होता.

सातारा जिल्ह्याला पूर्णवेळ आरोग्य अधिकार्‍याची आवश्यकता !

सातारा जिल्हा आरोग्य अधिकारी आधुनिक वैद्य अनिरुद्ध आठल्ये हे रत्नागिरी येथे प्रतिनियुक्तीवर गेले आहे. गत २ आठवड्यांपासून आधुनिक वैद्य सचिन पाटील हे प्रभारी म्हणून कार्यभार पहात आहेत; परंतु कोरोना काळात जिल्ह्यासाठी पूर्णवेळ आरोग्य अधिकारी असणे आवश्यक आहे, अशी मागणी सूज्ञ नागरिक करत आहेत.

पुणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची सनातनची युवासाधिका कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ ‘टिमवि’च्या संस्कृत परीक्षेत महाराष्ट्रात सर्वप्रथम !

कु. आर्या ही पुणे येथील अहिल्यादेवी हायस्कूलमध्ये शिकत असून तिने इयत्ता ९ वीच्या वार्षिक परीक्षेतही १०० टक्के गुण प्राप्त केले आहेत.

हिंगोली येथे पत्नी आणि मुलगा यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद !

आसोला येथे पुराच्या पाण्यामध्ये चारचाकी वाहून गेल्याने पत्नी आणि मुलगा यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पती विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद.

पुणे महापालिकेच्या वतीने ‘रेड लाईट’ भागात देवदासी भगिनींसाठी विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन !

२२० देवदासी भगिनींना आणि त्यांच्या कुटुंबियांना कोव्हिशिल्ड लस देण्यात आली. या वेळी देवदासी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सातारा येथे निवृत्त सैनिकाचे ग्रामस्थांकडून उत्साहात स्वागत !

सातारा जिल्ह्यातील उरमोडी धरणाजवळ अतिदुर्गम भागात वसलेल्या सायळी या गावातील सैनिक नाईक संतोष देवरे हे ४ मराठा लाईफ इंन्फंट्रीमधून नुकतेच निवृत्त झाले. गावातील माजी सैनिक होण्याचा पहिला मान त्यांना मिळाल्याने ग्रामस्थांनी त्यांचे उत्साहाने स्वागत केले.

अमली पदार्थांच्या तस्करीचे मूळ नष्ट करा !

पिंपरी-चिंचवडमध्ये (जिल्हा पुणे) ब्राऊन शुगर विकणार्‍या डिका थोरात या महिलेला अटक करण्यात आली. अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रकार यापूर्वीही अनेकदा उघड झाले आहेत. हा अपप्रकार देशाला आतून खिळखिळे करू शकतो.