कोयना पर्यटन विकासासाठी ७१ लाख रुपयांचा निधी !

सातारा, १६ जुलै (वार्ता.) – राज्यशासनाकडून कोयना विभागात कोयना पर्यटनाच्या विकासासाठी ७१ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

कोयनेच्या १० किलोमीटर परिसरातील प्रेक्षणीय ठिकाणे विकसित करण्याचा आराखडा सिद्ध केला असून त्यासाठी २८ कोटी रुपयांचा निधी संमत झाला आहे. कोयनानगर येथे थ्रीडी कारंजे, नेहरू उद्यान सुशोभिकरण, हिरकणी कक्ष आणि पर्यटन याअनुषंगाने विकासकामे केली जातील.