पुणे महापालिकेच्या वतीने ‘रेड लाईट’ भागात देवदासी भगिनींसाठी विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पुणे, १६ जुलै – पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल आणि उप आरोग्य प्रमुख वैशाली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली १२ जुलै या दिवशी पुणे महापालिकेच्या वतीने ‘रेड लाईट’ भागात देवदासी भगिनींसाठी विशेष लसीकरण मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. १५० वर्षांचा इतिहास असलेली पुणे सार्वजनिक सभा ही संस्थाही त्यात सहभागी झाली होती. या संस्थेच्या वतीने १५० व्या वर्धापन वर्षाचे औचित्य साधून सामाजिक उपक्रम म्हणून लसीकरण मोहीम संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. २२० देवदासी भगिनींना आणि त्यांच्या कुटुंबियांना कोव्हिशिल्ड लस देण्यात आली. या वेळी देवदासी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पुणे मनपा समाज विकास विभागातील समूह संघटिका अलका गुंजाळ यांनी देवदासी महिलांमध्ये जनजागृती करून या महिलांना लसीकरणासाठी प्रोत्साहित केले. भवानी पेठ क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. सारंग कालेकर, तसेच पुणे सार्वजनिक सभेचे अध्यक्ष श्री. विद्याधर नारगोलकर, कार्याध्यक्ष अनिल शिदोरे आदींचा कार्यक्रमात सक्रीय सहभागी होता.