निधन वार्ता

निपाणी येथील सनातन संस्थेचे साधक श्री. संदीप एकनाथ जाधव यांचे वडील एकनाथ दत्तात्रय जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

पायी वारीसाठी निघालेले संतवीर बंडातात्या कराडकर यांना कह्यात घेऊन सोडले !

पायी वारीसाठी निघालेले संतवीर बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. त्यांना फलटण येथील गुरुकुलमध्ये ठेवण्यात आले आहे. संतवीर बंडातात्या कराडकर यांना दिसताच क्षणी कह्यात घेण्याचा आदेश पोलिसांना देण्यात आला होता.

नवी मुंबईत भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक आक्रमण

भाजप नगरसेविका संगिता म्हात्रे यांचे पती संदीप म्हात्रे यांच्यावर दोन जणांनी प्राणघातक आक्रमण केले आहे. कोपरखैरणे सेक्टर ६ मधील कार्यालयात घुसून रिव्हॉल्वर आणि कोयता यांद्वारे आरोपींनी आक्रमण केले.

राजकीय कार्यक्रमांना अनुमती, मग गणेशोत्सवाच्या नियमावलीत कठोरता का ?

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असतांनाही अनेक राजकीय लोकांकडून सभा, आंदोलने, उद्घाटन कार्यक्रम घेतले जातात. या कार्यक्रमांना अनुमती दिली जाते, तर गणेशोत्सवाच्या नियमावलीत कठोरता का ?, असा प्रश्न येथील गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उपस्थित केला आहे.

कोल्हापूर महापालिकेने रंकाळा तलावाची स्वच्छता न केल्यास तीव्र आंदोलन ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कोल्हापूर आयुक्तांना निवेदन

सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या महापालिका प्रशासनास रंकाळा तलावाची ही दुरावस्था का दिसत नाही ? त्यासाठी निवेदन का द्यावे लागते ? नागरिकांच्या कररूपातून वेतन घेणारे अधिकारी मग नेमके काय करतात ?

ओ.एन्.जी.सी.त नोकरीसाठी प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन

उरण नागाव ओ.एन्.जी.सी. प्रकल्पामध्ये नोकरी मिळावी किंवा कंत्राट मिळावे, या मागणीसाठी नागाव म्हातवली बेरोजगार संघटनेच्या वतीने वरील आस्थापनाच्या समोर उपोषण चालू करण्यात आले आहे.

शालेय पोषण आहाराचे अनुदान बँक खात्यात जमा करण्याच्या सरकारच्या निर्णयाला शिक्षक समितीचा विरोध !

उन्हाळी सुटीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वितरित न करता तो अनुदान स्वरूपात थेट विद्यार्थ्यांच्या अधिकोष खात्यात जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय पालकांना परवडणारा नसल्याने या निर्णयाला पालक आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांनी विरोध केला आहे.

गोव्यातील संचारबंदीत १२ जुलैपर्यंत वाढ

दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत, तसेच केशकर्तनालये आणि क्रीडा मैदाने चालू करण्यास मुभा

आंबोली घाटाची दुरवस्था झाल्याच्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना घेराव

असे करण्याची वेळ का येते ? स्वतःहून अडचणींची नोंद न घेणार्‍या सरकारी अधिकार्‍यांवर त्वरित कारवाई होणे आवश्यक !