रायगड – उरण नागाव ओ.एन्.जी.सी. प्रकल्पामध्ये नोकरी मिळावी किंवा कंत्राट मिळावे, या मागणीसाठी नागाव म्हातवली बेरोजगार संघटनेच्या वतीने वरील आस्थापनाच्या समोर उपोषण चालू करण्यात आले आहे.
म्हातवली येथील प्रकल्पग्रस्त, बेरोजगार यांना जाणूनबुजून डावलले जात आहे, असा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकल्पासाठी शेतकर्यांची ५०० एकर भूमी संपादित केली आहे. नागाव म्हातवलीतील सर्व बेरोजगारांना ओ.एन्.जी.सी. आस्थापनामध्ये (प्रकल्पात) काम मिळावे, बेरोजगारांना कंत्राट मिळावे, अशी आमची प्रमुख मागणी आहे. याविषयी जोपर्यंत प्रशासनाकडून लेखी पत्र मिळत नाही, तोपर्यंत हा लढा आम्ही असाच चालू ठेऊ, असे संघटनेचे अध्यक्ष वैभव कडू यांनी सांगितले आहे.