लोकप्रतिनिधींवर प्राणघातक आक्रमणे होतात, म्हणजे शहराज कायदा-सुव्यवस्था अस्तित्वात नाही, हेच सामान्यांना वाटते.

नवी मुंबई – भाजप नगरसेविका संगिता म्हात्रे यांचे पती संदीप म्हात्रे यांच्यावर दोन जणांनी प्राणघातक आक्रमण केले आहे. कोपरखैरणे सेक्टर ६ मधील कार्यालयात घुसून रिव्हॉल्वर आणि कोयता यांद्वारे आरोपींनी आक्रमण केले. घायाळ संदीप म्हात्रे यांच्यावर नवी मुंबई महापालिका रुग्णालयात उपचार चालू आहेत. आक्रमणाचे कारण अद्याप अस्पष्ट असून कौपरखैरणे पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. या वेळी म्हात्रे यांनी आरडाओरड केली. तेव्हा आरोपींनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र लोकांनी एका आरोपीला पकडून पोलिसांच्या कह्यात दिले आहे. दुसरा आरोपी पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड
NEET Paper Leak : तुमच्यामुळे देशाची अपकीर्ती झाली, कोट्यवधी रुपयांची हानी झाली !
Bihar NEET Protest : बिहारच्या पाटलीपुत्र आणि सिवान येथे आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेक : पोलीस अधीक्षक घायाळ
Saharanpur Temple Theft : सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे शिवमंदिरात चोरी : ३ मुसलमानांना अटक