कोरोनाच्या उत्पत्तीसाठी वुहानमधील नव्हे, तुमच्या प्रयोगशाळेची चौकशी करा ! – चीनचे अमेरिकेला आव्हान

चीनने अमेरिकेला आव्हान देत बसण्यापेक्षा जागतिक मत त्याच्या विरोधात आहे, हे लक्षात घ्यावे. तसेच कोरोनाच्या निर्मितीविषयी जे सत्य आहे, ते जगाला सांगायला हवे !

मंदिरांचा कारभार भक्तांच्या माध्यमांतून होण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने लढा उभारायला हवा ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

हिंदूंच्या न्याय्य अधिकारांसाठी लढणारी अधिवक्त्यांची संघटना  हिंदु विधीज्ञ परिषद

(म्हणे) ‘विनापदवी कुणी डॉक्टर होत असेल, तर त्यांवर कारवाई करा !’

योगऋषी रामदेवबाबा यांनी स्वतः आयुर्वेदाचार्य असल्याचा दावा केला नाही. असे असतांना त्यांना आयुर्वेदाचा प्रसार करणे चुकीचे कसे ? आयुर्वेदाचा प्रसार करण्यामुळे कुणाच्या पोटात का दुखते ?

गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणा यांतील सेवानिवृत्त अधिकार्‍यांना कोणतीही माहिती सार्वजनिक करण्याआधी केंद्र सरकारची अनुमती घ्यावी लागणार !

आदेशाचे उल्लंघन झाल्यास निवृत्तीवेतन रोखले जाणार !

‘मुंबई सागा’ या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते यांना कायदेशीर नोटीस !

संघाची मानहानी करणारा संवाद चित्रपटातून काढावेत, अशी मागणी या नोटिसीद्वारे करण्यात आली आहे.

‘कोव्हॅक्सिन’च्या निर्मितीसाठी ‘हाफकिन बायोफार्मा’ला शासनाकडून १५९ कोटी रुपये अनुदान घोषित !

महाराष्ट्र शासनाकडून ९४ कोटी, तर केंद्रशासनाकडून ६५ कोटी रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे. यातून एका वर्षाला २२ कोटी ८ लाख डोस सिद्ध करण्यात येणार आहेत.

पंतप्रधान बेरोजगार भत्त्याच्या नावाखाली ‘एनी डेस्क टीम व्हूवर ॲप’ची माहिती ‘व्हॉटस्ॲप’द्वारे पाठवून लोकांची लूट !

ग्राहकांचे अधिकोष खाते रिकामे होण्याची शक्यता असल्याने लोकांनी सावध रहावे ! – पोलिसांचे आवाहन

युवकांनो, आदर्श हिंदु संघटक बनण्यासाठी लहान वयातच साधना करून धर्माचे रक्षण करा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा राज्य येथील युवा साधकांसाठी ‘ऑनलाईन’ कार्यशाळेचे आयोजन

लसीकरण करणार्‍या पंचतारांकित उपाहारगृहावर मुंबई महापौरांची धाड !

‘द ललित’ या पंचतारांकित उपाहारगृहात चालू असलेल्या लसीकरण मोहिमेच्या वेळी लसीकरणाच्या नियमांचे पालन होत नसल्याने महापौर डॉ. किशोरी पेडणेकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

नागपूर येथील मेयो रुग्णालयातील २०० हून अधिक निवासी आधुनिक वैद्य सामूहिक रजेवर !

अत्यवस्थ रुग्णांना आधुनिक वैद्यकीय सेवा देत असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. ‘मार्ड’च्या नेतृत्वाखाली हे आंदोलन चालू करण्यात आले आहे.