मलकापूर-कराडमध्ये मुसळधार पाऊस !
कराड शहरासह मलकापूर भागामध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शहरामध्ये ढगफुटी झाल्याप्रमाणे रस्त्यावरून पाणी वहात होते. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. त्यामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.