‘कोव्हॅक्सिन’च्या निर्मितीसाठी ‘हाफकिन बायोफार्मा’ला शासनाकडून १५९ कोटी रुपये अनुदान घोषित !

मुंबई – कोरोनावरील लसीकरण करण्यासाठी ‘कोव्हॅक्सिन’च्या निर्मितीसाठी ‘हाफकिन बायोफार्मा’ या शासकीय संस्थेला शासनाकडून १५९ कोटी रुपये इतके अनुदान घोषित करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून ९४ कोटी, तर केंद्रशासनाकडून ६५ कोटी रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे. यातून एका वर्षाला २२ कोटी ८ लाख डोस सिद्ध करण्यात येणार आहेत. ‘हाफकिन बायोफार्मा’च्या मुंबईतील परेल कॉम्प्लेक्समधील कार्यालयाच्या ठिकाणी हे डोस सिद्ध करण्यात येणार आहेत. ‘भारत बायोटेक लिमिटेड’कडून हे औषध निर्मितीचे तंत्रज्ञान ‘हाफकिन बायोफार्मा’कडे हस्तांतरित करण्यात आले आहे.