काळ्या बुरशीचा आजार संसर्गामुळे पसरत नाही ! – केंद्रीय आरोग्य मंत्रालय

काळ्या बुरशीचा (‘म्युकरमायकोसिस’चा) आजार संसर्गामुळे पसरत नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. रोगप्रतिकारशक्तीच्या अभावामुळे काळ्या बुरशीचा आजार होतो आणि त्याचा परिणाम मेंदूपर्यंत, तसेच लहान आतड्यांमध्येही होतो.

स्थलांतरित मजूर आणि कामगार यांना सरकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी निश्‍चित धोरण राबवा ! – सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला निर्देश

सर्वोच्च न्यायालयासह देशातील विविध उच्च न्यायालयांमध्ये कोरोनाच्या संदर्भात याचिका प्रविष्ट करण्यात आल्या आहेत. स्थलांतरित मजुरांच्या सूत्रावर प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

अंधश्रद्धा संबोधून आमच्या श्रद्धांना हात घालू नये ! – भाजपचे नेते सुजित झावरे

‘येशूला शरण गेल्यास कोरोना बरा होतो’, असे सांगत हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्त्यांच्या विरोधात अंनिसने तक्रार केल्याचे कधी ऐकले आहे का ?

साहाय्याचे स्वरूप योग्य होते का ? – खासदार गौतम गंभीर यांना देहली उच्च न्यायालयाचा प्रश्‍न

देहलीतील भाजपचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी काही आठवड्यांपूर्वी देहलीतील नागरिकांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन आणि फॅबीफ्लू या औषधांचे विनामूल्य वाटप केले होते. तेव्हा ही औषधे बाजारात उपलब्ध होत नव्हती. यावरून देहली उच्च न्यायालयात….

पद्मविभूषण पंडित छन्नूलाल मिश्रा यांच्या मुलीच्या मृत्यूच्या प्रकरणी चौकशी समितीकडून रुग्णालयाला निर्दोष घोषित

पद्मविभूषण पंडित छन्नूलाल मिश्रा यांची मोठी मुलगी संगीता मिश्रा यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या प्रकरणी चौकशी करणार्‍या समितीने तिचा अहवाला सरकारला सादर केला आहे. यात संबंधित रुग्णालयाला निर्दोष ठरवण्यात आले आहे.

अध्यात्मच जीवनाला यशस्वी बनवण्याचा मार्ग दाखवू शकते ! – पू. नीलेश सिंगबाळ, पूर्वाेत्तर भारत मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

या वेळी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या डॉ. श्रिया साह यांच्यासह काही युवकांनी साधनेमुळे त्यांच्यात झालेले पालट सांगितले. या कार्यक्रमाचा लाभ अनेक युवकांनी घेतला.

‘पृथ्वीराज’ या चित्रपटाचे नाव राजाचा सन्मान आणि प्रतिष्ठा यांच्यानुसार ठेवले जावे ! – करणी सेना

इतिहासाची मोडतोड होऊ न देता त्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्नरत असणार्‍या करणी सेनेचे अभिनंदन !

योगऋषी रामदेवबाबा यांच्याकडून आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून अ‍ॅलोपॅथीविषयीचे विधान मागे !

रामदेवबाबा यांनी विधान मागे घेणे, हे स्वागतयोग्य आणि त्यांच्या परिपक्वतेचे उदाहरण ! – डॉ. हर्षवर्धन

नागपूर येथे शस्त्रकर्माद्वारे गायीच्या पोटातून काढला ८० किलो प्लास्टिक कचरा !

प्लास्टिकच्या वापरावर सरकार बंदी कधी आणणार ?

मराठा आरक्षणासाठी मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन करणार्‍यांना पोलिसांनी घेतले कह्यात !

सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार बाजू मांडण्यास अल्प पडल्याचा आरोप करत मराठा आरक्षणाच्या सूत्रावरून मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन करणारे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे-पाटील यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले.