मराठा आरक्षणासाठी मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन करणार्‍यांना पोलिसांनी घेतले कह्यात !

मुख्यमंत्र्यांच्या त्यागपत्राची आंदोलकांकडून मागणी

मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन करणारे

मुंबई – सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार बाजू मांडण्यास अल्प पडल्याचा आरोप करत मराठा आरक्षणाच्या सूत्रावरून मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन करणारे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे-पाटील यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले.

१. ‘मराठा आरक्षणावर कायमस्वरूपी तोडगा काढला नाही, तर महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या घरावर काळे झेंडे लावा’, असे आवाहन आंदोलकांकडून करण्यात आले होते; मात्र त्यापूर्वीच आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले.

२. ‘राज्य आणि केंद्र सरकार यांच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण रहित झाले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी पदाचे त्यागपत्र द्यावे’, अशी मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली.