इतिहासाची मोडतोड होऊ न देता त्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्नरत असणार्या करणी सेनेचे अभिनंदन ! |
मुंबई – यशराज फिल्मस् यांची निर्मिती असलेल्या ‘पृथ्वीराज’ या चित्रपटाला करणी सेनेने विरोध दर्शवला असून ‘चित्रपटाचे नाव राजाचा सन्मान आणि प्रतिष्ठा यांच्यानुसार ठेवले जावे’, अशी त्यांची मागणी आहे. या चित्रपटात अभिनेते अक्षय कुमार आणि माजी विश्वसुंदरी मानुषी छिल्लर यांचा समावेश आहे. या मागणीसाठी करणी सेनेचे मुंबई अध्यक्ष दिलीप राजपूत यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे.
Prithviraj: अक्षय कुमार की फिल्म के खिलाफ करणी सेना ने खोला मोर्चा, फिल्म के नाम पर जताया विरोध https://t.co/qWgOF3sY51
— India TV Hindi (@IndiaTVHindi) May 24, 2021
या पत्रात म्हटले आहे…
१. सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या संदर्भात आम्ही काहीही चुकीचे खपवून घेणार नाही. सम्राट पृथ्वीराज म्हणजे राष्ट्रगौरव आणि आमच्या अस्मितेचे प्रतीक आहे. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे नाव आदरयुक्तच असायला हवे.
२. सध्या दिलेल्या नावातून त्यांची उपेक्षा आणि अवमानच होत आहे. चित्रपटाचे नाव न पालटल्यास करणी सेना आंदोलन अधिक तीव्र करेल.
३. चित्रपट निर्माते केवळ मनोरंजन आणि पैसे कमावण्याचे साधन या दृष्टीने चित्रपटाकडे पहातात. चित्रपट मसालेदार करण्यासाठी इतिहासाची मोडतोड करतात.
४. जो निर्माता चित्रपटाचे नाव नीट देऊ शकत नाही, तो चित्रपटात काय दाखवणार ? याविषयी शंका उत्पन्न होते.
५. सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जयंतीच्या निमित्ताने करणी सेनेने आयोजित केलेल्या एका बैठकीत यशराज फिल्मस् यांच्या विरोधात कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी मुंबई पोलिसांकडे करण्याचा प्रस्ताव पारित केला गेला.
६. करणी सेनेने यशराज फिल्मस् यांना नाव पालटण्याच्या दृष्टीने अंतिम समयमर्यादा दिली आहे.
७. या प्रकरणावर यशराज फिल्मस्ने अजूनपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हा चित्रपट ५ नोव्हेंबर २०२१ या दिवशी प्रदर्शित होणार असल्याचे समजते.