शनिवारवाड्याजवळ पेशवेकालीन हौद सापडला !

शनिवार पेठेजवळ (शनिवारवाडा परिसरात) महापालिकेच्या वतीने मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम चालू आहे. ३० एप्रिल या दिवशी खोदकाम चालू असतांना तेथे काही फूट खोल खणले असता पाण्याचा झरा, घडीव दगडातील पायर्‍या आणि हौद दिसला.

सोलापूरमध्ये एकाच रात्री बनशंकरी मंदिर आणि जगदंबा मंदिर येथे चोरी !

येथील शेळगी परिसरातील बनशंकरी मंदिर आणि जगदंबा मंदिर येथे पहाटे चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीसह देवीचे अलंकार चोरले. २ मेच्या पहाटे शेळगी परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता, याचा अपलाभ घेऊन ही चोरी झाली.

आंध्रप्रदेशामध्ये ऑक्सिजनपुरवठा बंद पडल्याने १६ कोरोना रुग्णांचा मृत्यू

राज्यातील अनंतपूर आणि कुर्नूल येथे ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्याने एकूण १६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. अनंतपूर येथील सरकारी रुग्णालयात ११, तर कुर्नूल येथील खासगी रुग्णालयात ५ जणांचा मृत्यू झाला.

पुण्यात १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी लसीकरणाची दोनच केंद्रे !

१ मे पासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी लस देण्याचा निर्णय घोषित केला असला, तरी लसीच्या तुटवड्यामुळे या निर्णयाची केवळ प्रातिनिधिक पद्धतीने कार्यवाही केली जाणार आहे.

बंगालमध्ये हिंदूंसाठी काळरात्र !

भाजप घेत असलेल्या राष्ट्रहितैषी निर्णयांना जनतेचा पाठिंबा मिळतो आणि तो मतपेटीतही रूपांतरीत होतो, हे भाजपने लक्षात घेऊन असे निर्णय घेऊन त्याविषयी ठाम रहावे, हीच जनतेची अपेक्षा आहे. 

अदर पूनावाला यांनी महाराष्ट्र आणि संपूर्ण देशासाठी महत्त्वाची भूमिका घ्यायला हवी होती ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

पुण्यामध्येच लस तयार करण्याचा कारखाना (प्लांट) असल्याने आपल्याला अधिक लस कशी मिळेल ? यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मराठी भाषेच्या समृद्धीकरता भाषांतर अ‍ॅप !

ज्ञान, माहिती तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण मराठी भाषेतून व्हावी तसेच इंटरनेटवर मराठीचा वापर वाढवून जगभरातील विविध क्षेत्रांतील ज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत मराठी भाषेतून पोचवण्यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एम्.के.सी.एल्.) प्रयत्न करत आहेत.

दायित्व चोख पार न पाडल्याने पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यातील २२ पोलिसांचे स्थानांतर !

दायित्व चोख पार न पाडणार्‍यांचे स्थानांतर करून त्यांच्यात पालट होणार आहे का ? अशा पोलिसांना शिक्षा करून पुन्हा काम करण्याची संधी देणे आणि असे वागणे अन्य पोलिसांकडून होऊ नये, यासाठी उपाययोजना काढणे आवश्यक आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त !

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राला राष्ट्रीय स्तरावरील ‘स्कॉच’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. पहिल्या टप्प्यात २०० हून अधिक प्रस्तावांमधून महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पहिल्या टप्प्यात निवड झाली.

भिवंडी येथे साडेचार लाख रुपयांच्या गोमांसासह टेम्पो जप्त; २ धर्मांधांना अटक

मुंंबई-नाशिक महामार्गावरील राजणोली नाका येथे गोमांसाची वाहतूक करणार्‍या एका टेम्पोवर कारवाई करत पोलिसांनी मंजूर गफूर मुल्ला (वय ३३ वर्षे) आणि सैफन गफूर शेख (वय २२ वर्षे) या २ धर्मांधांना अटक केली आहे.