भिवंडी येथे साडेचार लाख रुपयांच्या गोमांसासह टेम्पो जप्त; २ धर्मांधांना अटक

 

प्रतिकात्मक छायाचित्र

भिवंडी – तालुक्यातील मुंंबई-नाशिक महामार्गावरील राजणोली नाका येथे गोमांसाची वाहतूक करणार्‍या एका टेम्पोवर कारवाई करत पोलिसांनी मंजूर गफूर मुल्ला (वय ३३ वर्षे) आणि सैफन गफूर शेख (वय २२ वर्षे) या २ धर्मांधांना अटक केली आहे. त्यांच्याकडे ४ लाख ५० सहस्र रुपये किमतीचे गोमांस सापडले आहे. टेम्पो आणि गोमांस असा एकूण १६ लाख ५० सहस्र रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांनाही राज्यात धर्मांधांकडून गोहत्या आणि गोमांस यांची विक्री होत आहे. बंदी असूनही भिवंडी, कल्याण, मुंब्रा, ठाणे आणि मुंबई या भागांत गोमांस इतर जिल्ह्यांसह परराज्यांत विक्रीसाठी पाठवले जात आहेत. (आरोपींना कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच धर्मांधांना कायद्याचे भय राहिलेले नाही. त्यामुळेच गोहत्येच्या घटना वाढत आहेत. – संपादक)