महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मराठी भाषेच्या समृद्धीकरता भाषांतर अ‍ॅप !

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

मुंबई – ज्ञान, माहिती तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण मराठी भाषेतून व्हावी तसेच इंटरनेटवर मराठीचा वापर वाढवून जगभरातील विविध क्षेत्रांतील ज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत मराठी भाषेतून पोचवण्यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एम्.के.सी.एल्.) प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आय.टी.त.मराठी हे अ‍ॅप सिद्ध केले आहे. महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून ‘एम्.के.सी.एल्.’ने या अ‍ॅपची निर्मिती केली आहे.

मराठीतून इतर कोणत्याही भाषेत आणि अन्य कोणत्याही भाषेतून मराठीत भाषांतर करणे या अ‍ॅपमुळे सोपे होणार आहे. मराठीच्या समृद्धीसाठी आणि विकासासाठी हे अ‍ॅप विकसित केले आहे. संगणक, स्मार्टफोन यांवर मराठीचा वापर होण्यासाठी हे अ‍ॅप महत्त्वाचे ठरणार आहे. गूगल प्लेे स्टोअर किंवा एम्.के.सी.एल्.च्या संकेतस्थळावरून हे अ‍ॅप विनामूल्य डाऊनलोड करता येणार आहे, अशी माहिती एम्.के.सी.एल्.च्या वतीने देण्यात आली आहे. गूगलचा वापर करून माहिती शोधणे आणि मराठी टंकलेखन शिकणे तसेच सामाजिक माध्यामावरही मराठी वापरणे या अ‍ॅपमुळे शक्य होणार आहे.