श्रीनिवास रेड्डी यांच्याविषयी शासनाने मवाळ भूमिका घ्यावी ! – भारतीय वनसेवा असोसिएशनचे मुख्यमंत्र्यांना पत्र

दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्यानंतर श्रीमती यशोमती ठाकूर यांनी अधिकार्‍यांवर कारवाई होण्यासाठी धडपड चालू केली; मात्र दीपाली यांनी यशोमती ठाकूर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी त्वरित शिवकुमार याला बोलावून त्याला समज का दिली नाही ?, कारण त्या पालकमंत्री आहेत.

राज्यातील शैक्षणिक वर्षाला १४ जूनपासून प्रारंभ !

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना १ मेपासून उन्हाळी सुट्टी लागू करण्यात आली आहे. वर्ष २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाला १४ जूनपासून प्रारंभ होणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

धुळे येथे कोरोनाग्रस्त मृत रुग्णाचे पैसे आणि दागिने रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी चोरले !

रुग्णांचे रक्षक असणारे आरोग्य कर्मचारी रुग्णांचे भक्षक बनत असतील आणि रुग्णालये त्यांना पाठीशी घालत असतील, तर ते गंभीर आहे ! अशाने रुग्णालयावरील जनतेचा विश्‍वास उडाला तर आश्‍चर्य वाटायला नको !

घरी विलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित रुग्णावरील उपचारासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्षाची निर्मिती करावी ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

महानगरपालिकेच्या आयुक्तांसमवेत ‘ऑनलाईन’ संवाद साधतांना उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोनाच्या तिसर्‍या संभाव्य लाटेत लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग आढळण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी बोलून दाखवली आहे. याविषयी प्रशासनाने पूर्व नियोजन करून ठेवावे.

महाराष्ट्रात वेळ आल्यावर योग्य कार्यक्रम करू ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

महाविकास आघाडीने शेतकर्‍यांची वीज तोडली, त्याविषयी जनतेमध्ये असंतोष होता. पंढरपुरात आम्हाला विठ्ठलाचा आशीर्वाद मिळाला. हा विजय विठ्ठलाच्या चरणी अर्पण करतो. आज आमची शासनासमवेत लढाई नाही. कोरोनाच्या लढाईत आम्ही शासनासमवेत आहोत.

नवी मुंबई पालिका मुख्यालयात ऑक्सिजन पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी ‘वॉर रूम’ कार्यान्वित !

येथे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या नियंत्रणाखाली ६ जणांचे पथक कार्यरत आहे. येथून सकाळी ७ ते ११ या वेळेत महानगरपालिका आणि खासगी अशा सर्व कोविड रुग्णालयीन सुविधेतील ऑक्सिजनच्या साठ्याचा प्रति ३ घंट्यांनी आढावा घेतला जात आहे.

भाजपचे समाधान अवताडे ३ सहस्र ५०३ मतांनी विजयी !

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने येथील विधानसभेची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे घेतलेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके यांचा पराभव करत भाजपचे समाधान अवताडे ३ सहस्र ५०३ मतांनी विजयी झाले.

महाराष्ट्रदिनी राज्यातील २६ जिल्ह्यांत १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लसीकरणाला प्रारंभ !

महाराष्ट्र दिनाच्या दिवशी राज्यातील २६ जिल्ह्यांतील १३२ लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लसीकरणाला प्रारंभ झाला. १ मे या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ११ सहस्र ४९२ नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली.

आता पाणी डोक्यावरून गेले आहे, आजच्या आज ऑक्सिजन पुरवा !

न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारतांना म्हटले की, आम्ही केंद्र सरकारला निर्देश देतो की, त्यांनी काहीही करून देहलीला आजच्या आज ४९० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवावा. त्यासाठीचे टँकर पुरवण्याचे दायित्वही केंद्राचेच आहे.

बेळगाव पोटनिवडणुकीत भाजपच्या मंगला अंगडी विजयी

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार श्रीमती मंगला अंगडी यांनी काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांच्यावर २ सहस्र ९०३ मतांनी विजयी मिळवला आहे. खासदार सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी १७ एप्रिलला मतदान झाले होते.