सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त !

महापालिकेला मिळालेला ‘स्कॉच’ पुरस्कार

सांगली – सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राला राष्ट्रीय स्तरावरील ‘स्कॉच’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. पहिल्या टप्प्यात २०० हून अधिक प्रस्तावांमधून महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पहिल्या टप्प्यात निवड झाली. त्यानंतर ‘स्कॉच’कडून प्रश्‍नावलीद्वारे परीक्षण करण्यात आले. यात पात्र ठरल्यावर ‘स्कॉच’कडून ‘व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाईन’ परीक्षा घेण्यात आली. यानंतर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला ‘स्कॉच’ पुरस्कार घोषित करण्यात आला.