पर्यटक टॅक्सीचालकांना पणजी येथील आझाद मैदानात आंदोलन चालू ठेवण्याची अनुमती शासनाने नाकारल्याने तणावाचे वातावरण
पर्यटक टॅक्सी बंद ठेवून आंदोलन चालूच ठेवण्याचा आंदोलनकर्त्यांच्या निर्णय
निधन वार्ता
चिंचवड येथील दैनिक सनातन प्रभातचे वाचक आणि धर्मप्रेमी श्री. अनिल कट्टी वय (६७ वर्षे) यांचे १२ एप्रिल या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, १ मुलगी, जावई आणि १ नातू असा परिवार आहे.
शिरोली येथे हिंदुत्वनिष्ठांनी उभारली सामूहिक गुढी !
गेल्या ४ वर्षांपासून शिरोली आणि मत्तीवडे येथे हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकारानेे सामूहिक गुढी उभारण्यात येते. तेथील स्थानिक हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांनी सामूहिक गुढीची परंपरा चालू ठेवली.
ऑक्सिजनची वाहतूक करणार्या टँकरची पळवापळवी !
आता ऑक्सिजनचाही प्रश्न गंभीर होत चालला आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने सगळी रुग्णालये अडचणीत आली आहेत. यामुळे ऑक्सिजनची वाहतूक करणार्या टँकरची पळवापळवी चालू झाल्याचा प्रकार नगरमध्ये उघडकीस आला आहे.
उत्तरेकडील कामगार मूळगावी परतत असल्याने रेल्वेवर अतिरिक्त भार !
महाराष्ट्र राज्यात कठोर निर्बंध लागू केल्यानंतर परराज्यातील कामगार गावी परतत असल्याने त्याचा भार रेल्वेवर पडत आहे. वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता पुणे आणि मुंबई येथून एकाच दिवशी उत्तरेकडील राज्यात १३ विशेष गाड्या पाठवण्यात आल्या.
ओझर्डे (जिल्हा सातारा) येथील सैनिक सिक्कीम येथे कर्तव्यावर हुतात्मा !
सैनिक सोमनाथ अरविंद तांगडे हे सिक्कीम येथील कॉलिंगपाँग येथील बर्फाच्या टेकडीवर कर्तव्य बजावत होते. बर्फाच्छादीत प्रदेशात आलेल्या वादळी वार्याने आणि पावसाने गंभीर घायाळ झालेले तांगडे हे रुग्णालयात उपचार चालू असतांना हुतात्मा झाले.
संचारबंदीचे उल्लंघन करून कराटेचा वर्ग चालवणार्या शिक्षिकेला पोलिसांनी केला दंड !
तहसीलदार ज्योती देवरे आणि पोलीस निरीक्षक घनःश्याम बळप यांनी ठिकठिकाणी फिरून गर्दी असलेल्या ठिकाणांवर जाऊन कारवाई केली.
रेठरे बुद्रुक (जिल्हा सातारा) येथील रुग्णाचा मृत्यू लसीमुळे नव्हे, तर उच्च रक्तदाबामुळे
जाधव यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर उच्च रक्तदाबामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांनी दिली.
वैदिक हिंदु धर्माची कालगणना सर्वश्रेष्ठ आहे ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती
या व्याख्यानात ६४ धर्मप्रेमी युवक-युवती आणि त्यांचे २० पालक सहभागी झाले होते. उपस्थितांनी नववर्षारंभ गुढीपाडव्याच्या दिवशी साजरा करून हिंदु कालगणनेनुसार शुभेच्छा देणार, असा निर्धार करून हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प केला.