सोलापूर, १७ एप्रिल (वार्ता.) – गुढीपाडवा, चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेला नववर्षारंभ असण्याला नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व असून हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. याचा उल्लेख प्राचीन वेदांमधे आहे. संतांचे साहित्य, अभंग, लेख यांमध्येही गुढीचा उल्लेख केलेला आढळतो. आपल्या वैदिक हिंदु धर्माची कालगणना सर्वश्रेष्ठ आहे. हिंदु धर्माची उत्पत्ती होऊन अनेक वर्षे झाली असून हिंदु संस्कृतीला कोट्यवधी वर्षांचा प्राचीन इतिहास आहे, हे लक्षात घेऊन हिंदु संस्कृतीनुसार गुढीपाडवा सण साजरा करून धर्माचरण करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी केले. गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित ऑनलाईन व्याख्यानामध्ये ते बोलत होते.
या व्याख्यानात ६४ धर्मप्रेमी युवक-युवती आणि त्यांचे २० पालक सहभागी झाले होते. उपस्थितांनी नववर्षारंभ गुढीपाडव्याच्या दिवशी साजरा करून हिंदु कालगणनेनुसार शुभेच्छा देणार, असा निर्धार करून हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प केला.
अभिप्राय
|
क्षणचित्रे१. कार्यक्रमाच्या शेवटी हर हर महादेव, जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् या घोषणा देण्यात आल्या. २. व्याख्यानात सहभागी झालेल्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेतली. |