पुणे – महाराष्ट्र राज्यात कठोर निर्बंध लागू केल्यानंतर परराज्यातील कामगार गावी परतत असल्याने त्याचा भार रेल्वेवर पडत आहे. वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता पुणे आणि मुंबई येथून एकाच दिवशी उत्तरेकडील राज्यात १३ विशेष गाड्या पाठवण्यात आल्या. मध्य रेल्वेने आतापर्यंत २३० उन्हाळी विशेष गाड्या घोषित केल्या आहेत.
केवळ आरक्षण करून आणि तिकीट कन्फर्म असल्यासच संबंधित प्रवाशाला गाडीत प्रवेश दिला जाणार आहे. प्रवास करण्यापूर्वी ९० मिनिटे आधी स्थानकात प्रवेश करावा. रेल्वेचे प्रतीक्षा यादीकडे लक्ष असून आवश्यकतेनुसार अतिरिक्त विशेष गाड्या सोडण्यात येतील, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.