देवस्थाने सरकारी कचाट्यातून मुक्त होईपर्यंत हिंदू संपूर्णपणे स्वतंत्र नाहीत ! – अधिवक्ता किरण बेट्टदापूर, कर्नाटक उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय

कर्नाटकमधील एकट्या कोल्लूर मूकम्बिका देवस्थानात २२ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, तर इतर ४ लाख देवस्थानांत किती रुपयांचा घोटाळा झाला असेल ?, याचा विचार करता येणार नाही.

परमबीर सिंह यांना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा साक्षात्कार स्थानांतरानंतर का झाला ? – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

राज ठाकरे म्हणाले, ‘‘माझ्यासाठी अनिल देशमुख हा महत्त्वाचा विषय नव्हता. ‘कुणाच्या सांगण्यावरून मुकेश अंबानी यांच्या घराजवळ पोलिसांनी जिलेटिनची गाडी ठेवली ?’ हा मूळ विषय आहे. त्याचे अन्वेषण होणार आहे का ?

अकोला येथे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आचार्‍याच्या कानशिलात लगावली !

बच्चू कडू यांनी जिल्हा रुग्णालयातील खानावळीला भेट दिली. या वेळी कडू यांना खानावळीतील डाळीच्या दैनंदिन वापरात अपहार होत असल्याचे लक्षात आले आणि त्यातूनच त्यांनी स्वयंपाक्याच्या कानाखाली लगावली…..

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या २ मासांत वाघांच्या आक्रमणांत ९ लोकांचा मृत्यू !

जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पवनपार गावालगतच्या अरण्यात ६ एप्रिल या दिवशी सकाळी मोहफूल वेचण्यासाठी कमलाकर उंदीरवाडे आणि धुर्वास उंदिरवाडे गेले होते. त्या वेळी वाघाने आक्रमण करून त्यांना ठार केले.

मालमत्ता कराविषयी विरोधी पक्ष नागरिकांची दिशाभूल करत आहे ! – परेश ठाकूर, सभागृह नेते

वास्तविक मालमत्ता कर आकारणी हा विषय प्रशासनाच्या अखत्यारीतील असतांना विरोधक नाहक सत्ताधार्‍यांची अपर्कीती करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत….

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध काटेकोरपणे पाळा ! – जयंत पाटील, पालकमंत्री

पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते.

निकाल बाजूने लावण्यासाठी ५० सहस्र रुपयांची लाच घेणार्‍या न्यायाधिशाला काही अटींवर जामीन !

कुंपणानेच शेत खाल्ल्यास तक्रार कुणाकडे करायची ? भ्रष्ट न्यायाधीश असतील तर जनतेला न्याय मिळेल का ? अशा न्यायाधीशांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथे मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार (बच्चाबाझी) : एक विकृती !

प्रसारमाध्यमे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथील बच्चाबाझीसारख्या गंभीर अत्याचाराविषयी चकार शब्द काढत नाहीत. सार्‍याच बलात्कारी विकृतींचे मूळ एक असते. या राक्षसी प्रवृत्तींकडे दुर्लक्ष करणे घातक आहे !

महाराष्ट्रातील दळणवळण बंदीमुळे भारताला ४० सहस्र कोटी रुपयांचा आर्थिक फटका ! – केअर रेटिंग एजन्सी

महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या दळणवळण बंदीमुळे भारताला ४० सहस्र कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे, असे अनुमान ‘केअर रेटिंग एजन्सी’ने व्यक्त केले आहे.

सोलापूर मार्केट यार्ड येथे कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत पुष्कळ गर्दी

कोरोनाच्या आपत्काळात दायित्वशून्यपणे वागणारे असे नागरिक भीषण आपत्काळात काय करतील ?