कोरोनाच्या आपत्काळात दायित्वशून्यपणे वागणारे असे नागरिक भीषण आपत्काळात काय करतील, याची कल्पनाच न केलेली बरी !
सोलापूर – सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती (मार्केट यार्ड) येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर पाळण्याच्या नियमाचा फज्जा उडाल्याचे ५ एप्रिल या दिवशी पहायला मिळाले. २ एप्रिलपासून मार्केट यार्ड बंद असल्याने ५ एप्रिल या दिवशी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
४ एप्रिल या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’च्या अंतर्गत नवीन नियमावली घोषित केली आहे. या नियमावली अंतर्गत गर्दीचे ठिकाण पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र राज्यशासनाने घोषित केलेल्या नियमावलीच्या पहिल्या दिवशी सोलापूर मार्केट यार्ड येथे पुष्कळ गर्दी झाली होती.