देवस्थाने सरकारी कचाट्यातून मुक्त होईपर्यंत हिंदू संपूर्णपणे स्वतंत्र नाहीत ! – अधिवक्ता किरण बेट्टदापूर, कर्नाटक उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय

अधिवक्ता किरण बेट्टदापूर

कर्नाटकमधील एकट्या कोल्लूर मूकम्बिका देवस्थानात २२ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, तर इतर ४ लाख देवस्थानांत किती रुपयांचा घोटाळा झाला असेल ?, याचा विचार करता येणार नाही. दानपेटीतील पैशांचा अपहार, प्राचीन दागिन्यांचा आणि देवस्थानच्या भूमीचा अपहार असे अनेक घोटाळे यांत समाविष्ट आहेत. देवस्थाने सरकारी कचाट्यातून मुक्त होईपर्यंत हिंदू संपूर्णपणे स्वतंत्र नाहीत, असे मी मानतो.