मुसलमानांना १० टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मुस्लिम लीगचे निवेदन

निधर्मी देशात धर्माच्या आधारे आरक्षण मागणारी धर्मांध मुस्लिम लीग ! भारताच्या फाळणीची मागणी करून ती मिळवणार्‍या मुस्लिम लीगला आता धर्माच्या आधारे आरक्षण हवे, हे पहाता अशा पक्षावर बंदीच घातली पाहिजे !

… अन्यथा उत्तरदायी अधिकार्‍यांपैकी कुणालाही सोडणार नाही ! – मुंबई उच्च न्यायालयाची अन्वेषण यंत्रणांना चेतावणी

अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणी आणखी किती काळ तुमचे अन्वेषण चालू रहाणार ? कर्नाटक राज्यात यानंतर झालेल्या विचारवंतांच्या हत्येचे खटलेही चालू झाले. आपल्या राज्यात अद्याप खटले का चालू झाले नाहीत ?

धर्माचरणाचे महत्त्व !

‘लँड जिहाद, फतवा जिहाद, फिल्म जिहाद यांसारखे १४ प्रकारचे जिहाद केले जात आहेत. मोगलांनाही लाजवणारे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी युवतींनी स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन सिद्ध व्हावे.’

राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदी राजेश क्षीरसागर यांची फेरनियुक्ती !

राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदाला ‘कॅबिनेट’ मंत्रीपदाचा दर्जा आहे.

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नियंत्रण कक्षातून नागरी सुविधा केंद्रात स्थानांतर

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी वादात अडकलेले मुंबई पोलीस दलातील साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचे नागरी सुविधा केंद्राच्या कक्ष १ मध्ये स्थानांतर करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली दिलगिरी !

एम्.पी.एस्.सी. परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना त्रास झाला. एम्.पी.एस्.सी. हे प्रकरण व्यवस्थित हाताळायला हवे होते, त्यामध्ये एम्.पी.एस्.सी. कुठेतरी कमी पडली, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे केले.

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी माहितीचा अधिकार कायदा हे प्रभावी शस्त्र !

माहिती कायद्याचा आधार घेऊन आपण राष्ट्र आणि धर्म या कार्यासाठी त्याचा योग्य प्रकारे वापर करू शकतो. त्याआधारे सरकारवर लक्ष ठेवण्याचे काम करू शकतो.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा २१ मार्च या दिवशी होणार !

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एम्.पी.एस्.सी.) परीक्षा २१ मार्च या दिवशी होणार असल्याचे आयोगाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे घोषित केले आहे. यापूर्वी १४ मार्च या दिवशी होणारी ही परीक्षा रहित करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला होता.

हिंदूंच्या मतांसाठी माकपचा नाटकीपणा जाणा !

शबरीमला मंदिरामध्ये वर्ष २०१८ मध्ये महिलांच्या प्रवेशाला देण्यात आलेली अनुमती एक बंद अध्याय आहे. असे व्हायला नको होते, अशा शब्दांत केरळचे माकपच्या सरकारमधील मंत्री के. सुरेंद्रन् यांनी निवडणुकीच्या प्रसाराच्या वेळी खेद व्यक्त केला आहे.

महाआघाडी सरकारचा अर्थसंकल्प जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकणारा आहे ! – नारायण राणे, नेते, भाजप

महाआघाडी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा बनावट असून यात केवळ आकड्यांची हेराफेरी करण्यात आली आहे. हा जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकणारा अर्थसंकल्प आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी १२ मार्च या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.