कोल्हापूर – राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदी राजेश क्षीरसागर यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. या पदाला ‘कॅबिनेट’ मंत्रीपदाचा दर्जा आहे. मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी निवडीचे हे पत्र दिले आहे. मंत्रालयाच्या प्रशासकीय विभागात नियोजन विभाग महत्त्वाचा मानला जातो. जिल्हास्तरावर त्याची नियोजन मंडळे आहेत. त्याची शिखर संस्था म्हणून नियोजन मंडळ ओळखले जाते. नियोजन आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे राज्य, तसेच जिल्हास्तरावर पंचवार्षिक, तसेच वार्षिक योजना सिद्ध करणे, हे मंडळाचे मुख्य काम आहे.
या संदर्भात श्री. राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘‘राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळाल्याविषयी समाधानी असून या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी अधिकाधिक निधी कसा देता येईल, त्यासाठी प्रयत्न करू.’’