पुणे – एम्.पी.एस्.सी. परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना त्रास झाला. एम्.पी.एस्.सी. हे प्रकरण व्यवस्थित हाताळायला हवे होते, त्यामध्ये एम्.पी.एस्.सी. कुठेतरी कमी पडली, असे सांगत विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाविषयी मी दिलगिरी व्यक्त करतो, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे केले.
या प्रकरणी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरायची वेळ आली हे दुर्दैवी आहे. कोणतेही कारण नसतांना विरोधक रस्त्यावर उतरले. या प्रकरणात विरोधकांनीही राजकारण केले, तेही दुर्दैवी आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब लक्ष घातले आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यामुळे एम्.पी.एस्.सी.ने नवीन परिपत्रक काढल्याचेही त्यांनी सांगितले.