‘सत् आणि सत्संग हेच चैतन्य, आनंद आणि समाधान यांचा मुख्य स्रोत असल्यामुळे त्याविना राहू शकत नाही’, हे लक्षात आणून दिल्याविषयी परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

पृथ्वीतलावर मी कोणत्याही देशात गेले, तरी ‘मी माझ्या खर्‍या कुटुंबियांविना (साधकांविना) राहू शकत नाही’, असे मला वाटते. सत् चा प्रसार करणे आणि साधकांना शोधून त्यांच्याशी जवळीक साधणे, हीच खरी समष्टी साधना आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर संसदेचे हिवाळी अधिवेशन रहित ! – केंद्र सरकारचा निर्णय

संसदेचे कुठलेही अधिवेशन असले, तरी ते शांततेत पार पडते, असा इतिहास नाही. जनतेचे कोट्यवधी रुपये खर्च करून चालवण्यात येणार्‍या अधिवेशनात जर गदारोळच करण्यासाठी लोकप्रतिनिधी येणार असतील, तर त्याचा जनतेला काय उपयोग ?

गोमंतकीय जनतेने भाजपला विकासासाठी मतदान केले असल्याने मोले प्रकल्प राबवणार !

जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला निर्विवाद बहुमत प्राप्त झाले आहे. गोमंतकीय जनतेने भाजपला विकासासाठी मतदान केले आहे. शासन मोले येथील ‘तम्नार पॉवर ट्रान्स्मीशन लाईन’ प्रकल्प राबवणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दिली.

शेतकर्‍यांचे हित !

शेतकर्‍यांच्या आंदोलनात खलिस्तानी आणि माओवादी शक्ती बळ पुरवत असल्याची शक्यता आहे, अशी वृत्ते पुराव्यानिशी येत आहेत. हे धोकादायक आहे.

माझ्या विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो ! – बिहारमधील भाजपच्या मंत्र्यांचे विधान

स्वतःच्या खात्यात होणारा भ्रष्टाचार स्वतः मंत्र्यांनीच कठोर कारवाईचा आदेश देऊन रोखायला हवा आणि त्याची माहिती नंतर जनतेला द्यायला हवी ! आता अशा प्रकारे विधान केल्यावर भ्रष्टाचारी सतर्क होतील !

‘वेब सिरीज’च्या माध्यमातून हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्यावर आघात करणार्‍यांना दंड मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही ! – अधिवक्ता खुश खंडेलवाल

सध्या हिंदु धर्म, देवता, संत आणि संस्कृती यांच्यावर वेब सिरीजच्या माध्यमातून आघात केला जात आहे. आम्ही हिंदू न्यायप्रक्रिया आणि प्रशासकीय व्यवस्था यांवर विश्‍वास ठेवतो; म्हणूनच कायद्याच्या मार्गाने हिंदी चित्रपटसृष्टीच्या विरोधात लढत आहोत.

आयुर्वेदाला सर्वमान्यता आवश्यक !

केंद्रशासनाने आयुर्वेदाच्या प्रसारासाठी पदव्युत्तर आयुर्वेदीय वैद्यांना ५८ प्रकारची शस्त्रकर्मे करण्याची अनुमती दिली. केंद्रशासनाने एक चांगला निर्णय घेतलेला असतांना दुसरीकडे अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांनी मात्र याला विरोध दर्शवत नुकताच एक दिवसाचा देशव्यापी संप केला !

शासनाच्या विरोधात बोलणार्‍यांच्या विरोधात पोलिसांचा वापर !

लोकप्रतिनिधीच जर नियम पाळत नसतील, तर ‘ते सामान्यांनी पाळावे’, अशी अपेक्षा काय करणार ?

आता शेळ-मेळावली येथे आयआयटी प्रकल्प उभारा !

भाजपवर लोकांनी विश्‍वास दाखवला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना जर शेळ-मेळावली येथे आयआयटी प्रकल्प उभारायचा आहे, तर त्यांनी त्यासंबंधीची प्रक्रिया त्वरित चालू करावी, असे माझे आवाहन आहे.