नव्या संसद भवनाच्या बांधकामाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

येत्या १० डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार्‍या नव्या संसद भवनाच्या बांधकामालाच सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे; मात्र भूमीपूजन करण्यास कोणतीही अडचण नाही, असेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.

पोलिसांच्या उपस्थितीत महिला पत्रकारावर धर्मांध कसायांचे आक्रमण

‘हासन (कर्नाटक) येथे अवैधरित्या होणार्‍या गोहत्येचा विरोध करणार्‍या एका महिला पत्रकारावर धर्मांध कसायांनी  आक्रमण केल्याची घटना येथील पेन्शन मोहल्ला येथे घडली. ही महिला पत्रकार पशूप्रेमी आणि पोलीस यांच्यासह ४ अवैध पशूवधगृहे अन् गोवंश ठेवलेल्या ५ ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत होती.’

अमली पदार्थ बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या कॅनाबिसच्या लागवडीमध्ये गोव्यात वाढ

चरस, गांजा आदी अमली पदार्थ बनवण्यासाठी वापरला जाणारा प्रमुख घटक म्हणजे ‘कॅनाबिस’ ! या रोपांची लागवड आता गोव्यात केली जात आहे. अशा प्रकारची मागील एका वर्षात ८ प्रकरणेे उघडकीस आली, तर नोव्हेंबर २०२० या एका मासातच ४ प्रकरणे उघडकीस आली आहेत.

आंध्रप्रदेशच्या एलुरू जिल्ह्यामध्ये अज्ञात आजारामुळे एकाचा मृत्यू, तर २९२ जण आजारी

संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाशी सामना करत असतांना आंध्रप्रदेशच्या एलुरू जिल्ह्यामध्ये एका अज्ञात आजारामुळे एकाचा मृत्यू झाला आहे, तर २९२ हून अधिक लोक आजारी पडले आहेत.

सिंधुदुर्गातील कोरोनाविषयीची सद्य:स्थिती

दळणवळण बंदीमध्ये शिथिलता आली, याचा अर्थ कोरोनाचे संकट टळले असे नाही, हे जिल्ह्यात वाढणार्‍या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येवरून लक्षात येते. जनतेने कोरोनाविषयीच्या शासकीय आणि वैद्यकीय नियमांचे पालन करणेच योग्य !

१२ लाख रुपयांची अवैध मद्याची वाहतूक केल्याप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

सातत्याने गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्हा आणि महाराष्ट्रात अवैध मद्याची वाहतूक होत असल्याच्या घटना उघड होत आहेत. पोलिसांनी कारवाई केली, तरीही हे प्रकार चालूच आहेत.

पाकमध्ये मुसलमान तरुणाचा विवाहाचा प्रस्ताव नाकारणार्‍या ख्रिस्ती तरुणीची हत्या

याविषयी भारतातील तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि पाकप्रेमी तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महिलांसाठी ‘ऑनलाईन सोशल मिडिया प्रशिक्षण शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

फोंडा, गोवा  सध्याच्या काळात सामाजिक माध्यमांचे महत्त्व लक्षात घेता घरबसल्या समाजात राष्ट्र आणि धर्म विषयक जागृती करण्याच्या उद्देशाने नुकतेच धर्मप्रेमी महिलांसाठी ‘ऑनलाईन सोशल मिडिया प्रशिक्षण शिबिर’ घेण्यात आले. या शिबिराचा अनेक धर्मप्रेमी महिलांनी लाभ घेतला.

राज्यातील ‘जलक्रीडा’ चालू करण्याविषयी लवकरच आदर्श कार्यप्रणाली ! – अस्लम शेख, मत्स्यव्यवसाय मंत्री, महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये पर्यटन व्यवसायाला अनुकूल वातावरण आहे. रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता या क्षेत्रामध्ये आहे.

आसाममधील ‘एआययूडीएफ’च्या ‘अजमल फाऊंडेशन’ला विदेशी जिहादी संघटनांकडून मिळाल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्या ! – ‘लीगल राइट्स ऑब्जर्वेटरी’चा दावा

‘लीगल राइट्स ऑब्जर्वेटरी’ या संस्थेला अशी माहिती मिळते, ती सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या केंद्र सरकारला का मिळत नाही ? असा प्रश्‍न उपस्थित होतो !