‘लीगल राइट्स ऑब्जर्वेटरी’ या संस्थेला अशी माहिती मिळते, ती सर्व यंत्रणा हाताशी असणार्या केंद्र सरकारला का मिळत नाही ? असा प्रश्न उपस्थित होतो ! अशा जिहादी संस्थांची चौकशी करून त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे !
गौहत्ती (आसाम) – येथील ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’ (एआययूडीएफ्) या पक्षाच्या ‘अजमल फाऊंडेशन’ या संस्थेवर विदेशातून संशयास्पदरित्या ६९ कोटी ५५ लाख रुपयांच्या देणग्या मिळवल्याचा आरोप आहे. ‘लीगल राइट्स ऑब्जर्वेटरी’ या संस्थेने हा आरोप केला आहे. या संस्थेने तिच्याकडे असलेली सर्व माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर केली आहे. तसेच अजमल फाऊंडेशनची अनुज्ञप्ती रहित करण्याची मागणीही केली आहे. या संस्थेचे म्हणणे आहे की, ‘अजमल फाऊंडेशन’ला मिळालेला पैसा हा आंतकवाद्यांना अर्थपुरवठा करणारे आणि आर्थिक गैरव्यवहार यांमध्ये सहभागी असणार्यांचा आहे. यात तुर्कस्तान, पॅलेस्टाईन आणि ब्रिटन येथील आतंकवादी गटांचा समावेश आहे. या संस्थेचे म्हणणे आहे की, अजमल फाऊंडेशनला मिळालेल्या पैशांतील २ कोटी ५ लाख रुपये तिने शिक्षणावर खर्च केले आहेत. उर्वरित पैसे पक्षाला दिले जात आहेत.
#FCRAViolation Ajmal Foundation of @BadruddinAjmal got Rs 69.55 Cr for educn, used only Rs 2.05 Cr for it, rest routed for #AIUDF, to counter @himantabiswa‘s #Hindutva juggernaut, #Turkish n UK terror grps funded it in crores! Wrote @HMOIndia for #FCRA cancellation. Details here+ pic.twitter.com/xqIbbhqb7V
— Legal Rights Observatory- LRO (@LegalLro) December 3, 2020
१. पैसे देणार्या विदेशी संघटनांमध्ये ब्रिटनमधील ‘अल् इम्दाद फाऊंडेशन’ नावाची एक संघटना आहे. हिचे पॅलेस्टाईनमधील आतंकवादी संघटना हमासशी संबंध आहेत. या फाऊंडेशनने हलाल सर्टिफिकेशनच्या शुल्कातून लाखो रुपये गोळा केले असून त्यातील पैसा आतंकवादी कारवायांसाठी दिला जात आहे.
२. ‘उम्माह वेल्फेयर ट्रस्ट’ ही अन्य एक संघटना आहे. तिच्यावर आर्थिक गैरव्यवहार आणि आतंकवाद्यांना अर्थपुरवठा केल्याचा आरोप आहे. अमेरिकेने हिला आतंकवादी संघटना घोषित केले आहे.
३. तुर्कस्तान येथील ‘इंसानी यरदीम वक्फी’ या संघटनेकडूनही अजमल फाऊंडेशनला पैसे मिळतात. याचा संबंध अल् कायदा आणि जागतिक जिहादी जाळ्याशी आहे. वर्ष २०१४ मध्ये या संस्थेने अल् कायदाला शस्त्रपुरवठा केला होता. या संस्थेशी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचेही संबंध आहेत. वर्ष २०१८ मध्ये या संस्थेच्या नेत्यांनी पी.एफ्.आय.च्या पदाधिकार्यांची भेटही घेतली होती.
४. ‘मुस्लिम एड् यू.के.’ ही आणखी एक संघटना अजमल फाऊंडेशनला अर्थपुरवठा करते. काश्मीरमध्ये कार्यरत जिहादी संघटना हिजबुल मुजाहिदीनशी हिचे संबंध आहेत.
५. राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते यांनी बदरुद्दीन अजमल अन् ते अध्यक्ष असलेल्या ‘एआययूडीएफ्’ या पक्षावर यापूर्वीच लव्ह जिहादला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला होता. त्यांनी म्हटले होते की, आसाममधील हिंदु मुलींना अजमल यांचे समर्थक सामाजिक माध्यमांद्वारे लक्ष्य करत आहेत. इस्लामी कट्टरतावाद्यांना अजमल यांच्या सारख्यांकडून प्रोत्साहन मिळत आहे.
६. वर्ष २०१२ मध्ये अजमल यांच्या पक्षावर जिहादी शक्तींना आसाममध्ये प्रशिक्षण दिल्याचा आरोप करण्यात आला होता.