बेतुल येथील किल्ल्याच्या संवर्धनासाठी क्षत्रिय मराठा पारंपरिक मासेमार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्याना निवेदन सादर

छत्रपती शिवाजी महाराज यांनी गोव्यात बेतुल येथे बांधलेल्या किल्ल्याच्या संवर्धनासाठी क्षत्रिय मराठा पारंपरिक मासेमार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना २८ नोव्हेंबरला निवेदन सादर करण्यात आले.

देशभरात वाढलेली महिला आणि मुली बेपत्ता होण्याची प्रकरणे, हा गंभीर प्रश्‍न !

वर्ष २०१५ पासून महाराष्ट्रातून २६ सहस्रांहून अधिक व्यक्ती बेपत्ता झाल्या आहेत. यांपैकी महिला आणि मुली हरवल्याचे प्रमाण २१ सहस्रांहून अधिक आहे. यात गत ४ ते ६ वर्षांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

सिंधुदुर्गात १ डिसेंबरपासून क्षयरोग आणि कुष्ठरोग रुग्ण शोधमोहीम

जिल्ह्यात क्षयरोग आणि कुष्ठरोग रुग्ण शोधमोहीम राबवण्याकरता ७ लाख ३४ सहस्र ३१४ इतक्या लोकसंख्येचे सर्वेक्षण ‘आशा’ स्वयंसेविका आणि पुरुष स्वयंसेवक यांच्या पथकाद्वारे करण्यात येणार आहे.

सिंधुदुर्गात १७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले

गेल्या २४ घंट्यांत जिल्ह्यात १७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ५ सहस्र २५१ झाली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २७ नोव्हेंबरला देहली येथे माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीभवनमध्ये भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपतींना ५९ व्या गोवा मुक्तीदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याविषयी निमंत्रण दिले.

आपत्काळासाठीची पूर्वसिद्धता : पावसाळ्यामध्ये नैसर्गिकपणे उगवलेल्या औषधी वनस्पतींचा संग्रह करा ! (भाग १)

भावी भीषण महायुद्धकाळात डॉक्टर, वैद्य, औषधे इत्यादी उपलब्ध होणार नाहीत. क्रमशः प्रसिद्ध होणार्‍या लेखाच्या या भागात ‘निसर्गातील वनस्पतींचा संग्रह कसा करावा’, हे समजून घेऊया.

देवतेला भावपूर्ण नैवेद्य दाखवून तो ‘प्रसाद’ या भावाने ग्रहण केल्याने व्यक्तीला होणारा आध्यात्मिक लाभ !

‘हिंदु धर्मात देवतेला नैवेद्य दाखवून तो प्रसाद म्हणून ग्रहण केला जातो’, या संदर्भात सनातनच्या रामनाथी आश्रमात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’कडून वैज्ञानिक चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणे, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण …

उन्हाचे उपाय केल्याने (अंगावर ऊन घेतल्याने) व्यक्तीला आध्यात्मिक लाभ होणे

‘उन्हाचे उपाय करणे’ (अंगावर ऊन घेणे) या संदर्भात सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’कडून वैज्ञानिक चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण देत आहोत . . .

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘खरे सुख केवळ साधनेनेच मिळते, भ्रष्टाचाराने मिळवलेल्या पैशांनी नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधकांनो, श्रीविष्णूला अपेक्षित अशी साधना करून अंतरंगातील वैकुंठलोकाची अनुभूती घ्या !

‘विष्णुभक्ती करण्यासाठी आपल्या सर्वांना मिळालेली अमूल्य संधी म्हणजे ‘वैकुंठचतुर्दशी !’ वैकुंठचतुर्दशी या दिवसाचे महत्त्व असे आहे की, या दिवशी सर्व भक्तांसाठी वैकुंठाचे द्वार खुले असते. जो भक्त या दिवशी थोडीशीही विष्णुभक्ती करतो, त्याच्यासाठी वैकुंठधामात स्थान मिळणे सुनिश्‍चित आहे.