सिंधुदुर्गात १७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले

सिंधुदुर्ग – गेल्या २४ घंट्यांत जिल्ह्यात १७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ५ सहस्र २५१ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या ४ सहस्र ८८६ आहे. जिल्ह्यात सध्या २१५ रुग्णांवर उपचार चालू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १४२ झाली आहे.