राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाचा ८ डिसेंबरला समारोप !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाचा ८ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता समारोप होणार आहे. या कार्यक्रमाला पंच पीठांपैकी एक पीठ असलेल्या काशीपीठाचे ८७ वे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.

मुंबईतील धोकादायक आणि रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला राष्ट्रपतींची संमती !

राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास अधिनियम सुधारणा विधेयकाला संमती दिली आहे. यामुळे मुंबईतील धोकादायक आणि रखडलेल्या सेस (उपकर) इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणारे ६ प्राध्यापक ५ दिवसांसाठी निलंबित !

अशांना निलंबित नाही, तर बडतर्फ करणेच आवश्यक आहे ! याविरोधात तक्रार करण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली, प्रत्यक्षात महाविद्यालयानेच त्यांच्याकडे लक्ष ठेवून कारवाई करणे आवश्यक होते !

युद्धसरावाशी तुमचा काही संबंध नाही !  – अमेरिकेने चीनला सुनावले !

उत्तराखंडमधील औली येथील सीमेजवळ भारत आणि अमेरिका यांच्या सैन्यामध्ये युद्धसराव चालू आहे. यावर चीनने आक्षेप घेतला आहे. त्यावर भारत आणि अमेरिका यांनी चीनला सुनावलेे आहे.

घाटकोपर (मुंबई) येथे हरित लवादाच्या आरक्षित जागेवर अवैधपणे मदरशाचे बांधकाम !

अवैधपणे मदरशाचे बांधकाम होईपर्यंत प्रशासन आणि पोलीस झोपले होते का ? त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधितांवर प्रथम कारवाई करा !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘माफीवीर’ म्हणून हिणवणारे राहुल गांधी यांनी फाळणीसाठी उत्तरदायी असणार्‍या नेहरूंविषयीचे सत्य बोलण्याचे धारिष्ट्य दाखवावे !

राहुल गांधी यांच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे इंग्रजांसाठी काम करत होते’, या आरोपावरील श्री. रणजित सावरकर यांचा रोखठोक प्रतिवाद !

‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’चे अध्यक्ष बद्रुद्दीन अजमल यांची क्षमायाचना

आसाममध्ये भाजपचे सरकार आहे. सरकारने स्वतःहून अजमल यांच्या विरोधात हिंदूंच्या भावना दुखावल्यावरून गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे आणि कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !

(म्हणे) ‘मोगलांनी हिंदूंना विरोध केला असता, तर हिंदू शिल्लकच राहिले नसते !’

मुळसावळगी यांची विधाने हास्यास्पद आहेत अशा विचारांची लोक मोठ्या पदापर्यंत कशी पोचतात, हाच आता एक संशोधनाचा विषय ठरू शकतो !

मुसलमान मुलींसाठी महाविद्यालये स्थापन करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही ! – कर्नाटक सरकार

कर्नाटकातील भाजप सरकार मुसलमान मुलींसाठी १० नवीन महाविद्यालये स्थापन करणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर कर्नाटकात मोठा वाद निर्माण झाला होता.

धर्मांतर केल्यानंतर पूर्वीच्या धर्मातील जातीचा वापर करता येणार नाही !

हे अनेकदा न्यायालयांनी स्पष्ट केलेले असतांनाही या संदर्भात परत परत याचिका प्रविष्ट केली जाते. या संदर्भात आता न्यायालयांनी कठोर आदेश देऊन यावर बंदी आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असेच कायदाप्रेमी जनतेला वाटते !