बेंगळुरू – मुसलमान मुलींसाठी महाविद्यालये स्थापन करण्याचा कुठलाही प्रस्ताव शासनासमोर नाही, असा खुलासा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी येथे केला. कर्नाटकातील भाजप सरकार मुसलमान मुलींसाठी १० नवीन महाविद्यालये स्थापन करणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर कर्नाटकात मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वरील खुलासा केला.
Karnataka: सीएम बोम्मई बोले, मुस्लिम छात्राओं के लिए अलग कॉलेज खोलने का कोई प्रस्ताव नहीं#Karnataka #MuslimWomenStudents #Hijabrow https://t.co/fHYAqF7Bfq
— Amar Ujala (@AmarUjalaNews) December 1, 2022
यापूर्वी मौलाना (इस्लामी अभ्यासक) शफी सादी म्हणाले होते, ‘‘मी मुलींसाठी महाविद्यालय चालू करण्याविषयी बोललो होतो. आमच्या वक्फ बोर्डाकडे २५ कोटी रुपयांचा निधी आहे. प्रत्येक महाविद्यालयासाठी अडीच कोटी रुपये देणार असून १० जिल्ह्यांत महाविद्यालये चालू करण्यात येणार आहेत. याविषयी मंत्र्यांशी चर्चा झाली आहे.’ याविषयी मुख्यमंत्री बोम्माई यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘कर्नाटक राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष मौलाना शफी सादी यांचे ते वैयक्तिक विचार असू शकतात. वक्फ मंडळाच्या अध्यक्षांनी याविषयी सरकारशी चर्चा करावी.’’
हिंदु संघटना होत्या आंदोलनाच्या पावित्र्यात !
मौलानांच्या विधानानंतर हिंदु संघटनांनी राज्यव्यापी निदर्शने करण्याची चेतावणी दिली होती. ‘सरकारला मुसलमान मुलींसाठी स्वतंत्र महाविद्यालये बांधू देणार नाही’, असा पवित्रा हिंदु संघटनांच्या प्रतिनिधींनी घेतला.
हिंदूंसाठीही स्वतंत्र महाविद्यालये आणि विद्यापिठे बांधली पाहिजेत ! – हिंदु जनजागृती समिती
याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना हिंदु जनजागृती समितीचे मोहन गौडा म्हणाले, ‘‘मुसलमान मुलींसाठी स्वतंत्र महाविद्यालये बांधली जाणार असतील, तर हिंदूंसाठीही स्वतंत्र महाविद्यालये आणि विद्यापिठे बांधली पाहिजेत.’’