महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही ! – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी बोलणे झाले आहे. कर्नाटक महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही. या प्रकरणात कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

नामांकित ज्येष्ठ अधिवक्त्यांना काही कालावधीसाठी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनवा !

या अधिवक्त्यांचे ज्या क्षेत्रात कौशल्य आहे अशा क्षेत्रातील खटले निकाली काढण्याची अनुमती दिल्यास खटल्यांच्या निकालाचा दर वाढण्यासाठी हे प्रभावी ठरेल.

तेलंगाणा पोलिसांनी उघड केले देशभरात चालणारे वेश्याव्यवसायाचे मोठे जाळे !

जर हे जाळे देशभरात चालू होते, तर अन्य राज्यांतील पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा यांना ही माहिती का मिळाली नाही ?

राष्ट्रध्वज फाडून त्याचा फळा पुसण्यासाठी केला वापर !

धर्मांध कितीही शिकले, तरी त्यांच्यातील धर्मांधता नष्ट होत नाही आणि ते सर्वधर्मसमभावाचेही पालन करत नाहीत, हे नेहमीच लक्षात येते ! अशा घटनेविषयी निधर्मीवादी कधीही बोलणार नाहीत ! इक्बाल यांनी कधी पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाचा असा वापर केला असता का ?

हरियाणातील महाविद्यालयाच्या भिंतींवर लिहिण्यात आल्या ‘खलिस्तान झिंदाबाद’ आणि ब्राह्मणविरोधी घोषणा !

या प्रकरणी बंदी घालण्यात आलेली खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’चा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पाच मिनिटांत ‘भगवद्गीता’ ग्रंथ लिहिण्याचा जागतिक विक्रम !

‘शिक्षण मंडळ, कराड’ या संस्थेने हा अभिनव उपक्रम कै. अनंत श्रीधर भागवत यांच्या स्मृतीस समर्पित केला. कै. अनंत भागवत यांनी ७० वर्षे शाळेत भगवद्गीता शिकवली होती. त्यांच्या स्मरणार्थ शिक्षण मंडळाच्या वतीने आंतरराष्ट्रीय भगवद्गीता पाठांतर स्पर्धा घेतल्या जातात.

फरीदाबाद (हरियाणा) येथील गीता महोत्सवामध्ये सनातन संस्थेचा सहभाग !

फरीदाबाद येथे जिल्हास्तरीय गीता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ, सात्त्विक उत्पादने, तसेच धर्मशिक्षण देणारे प्रदर्शन लावण्यात आले होते.

नागपूर जिल्ह्यातील काही गावांत मौल्यवान सोन्याचे साठे आढळले !

महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि भंडारा, तसेच आता नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील परसोडी, किटाळा आणि मरूपार या गावांच्या खाली सोन्याचे साठे आहेत; मात्र त्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचा अंदाज आहे. तसा अहवाल भूगर्भ सर्वेक्षण विभागाने दिला आहे.

कोरियातील यूट्यूबर महिलेच्या विनयभंगाचे प्रकरण !

कोरियातील यूट्यूबर महिलेचा खार येथे विनयभंग करणारे मोबीन शेख आणि महंमद अन्सारी यांची वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने १५ सहस्र रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली.

केंद्रातील मागील सरकारांनी काश्मिरी हिंदूंचा नरसंहार नाकारल्याने भारतात जिहादचा प्रसार झाला !

तथ्य-शोधक समितीच्या अहवालाचा निष्कर्ष