‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’चे अध्यक्ष बद्रुद्दीन अजमल यांची क्षमायाचना

हिंदू ४० वर्षांपर्यंत लग्न करत नाहीत आणि या काळात २-३ अवैध बायका ठेवतात’, असे केले होते विधान !

खासदार बद्रुद्दीन अजमल

करीमगंज (आसाम) – येथील ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’चे अध्यक्ष तथा खासदार बद्रुद्दीन अजमल यांनी हिंदूंविषयी केलेल्या विधानावरून क्षमायाचना केली आहे. ‘मी हिंदूंविषयी काहीही म्हटले नाही’, असे त्यांनी क्षमा मागतांना म्हटले आहे. (अजमल यांचा साळसूदपणा ! – संपादक) तत्पूर्वीच अजमल यांच्या विरोधात हिंदु युवा छात्र परिषदेने नौगाव येथे पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. भाजपकडूनही अजमल यांच्यावर टीका करण्यात आली होती.

येथील एका कार्यक्रमात अजमल म्हणाले होते की, मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यास तिच्या लग्नाला सरकारने अनुमती दिली आहे. ते (हिंदू) लोक ४० वर्षांपर्यंत लग्न करत नाहीत. या काळात २-३ अवैध बायका ठेवतात. त्यांना मुले होऊ देत नाहीत. ते स्वतःचा खर्च वाचवतात. एकप्रकारे ते चेष्टा करतात. ४० वर्षानंतर आई-वडिलांनी लग्नासाठी प्रवृत्त केले किंवा ते कुठे अडकले, तर ते लग्न करतात; पण ४० वर्षानंतर मूल जन्माला घालायची त्यांच्यात क्षमता कुठे रहाते ? तेथून पुढे मूल जन्माला घालायचे आणि त्याला वाढवायचे, अशी आशा ते कसे काय ठेवू शकतात ? योग्य वयात लग्न झाल्यास सर्व गोष्टी योग्य होऊ शकतात. त्यामुळे मुसलमानांची ही पद्धत तुम्हीही मान्य करायला हवी. मुलाचे लग्न २० ते २२ व्या वर्षी, तर मुलीचे लग्न १८ ते २० व्या वर्षापर्यंत करावे. मग बघा तुमच्यातही अनेक मुले जन्माला येतील. (‘महिला म्हणजे मुले जन्माला घालण्याचा कारखाना’ अशीच मुसलमानांची मानसिकता असल्याने अजमल यांनी असे विधान केले आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक)

संपादकीय भूमिका

हिंदूंविषयी हिंदूंच्याच देशात राहून अशा प्रकारची विधाने करण्याचे धाडस हे हिंदूंच्या निष्क्रीयतेमुळेच होते. आसाममध्ये भाजपचे सरकार आहे. सरकारने स्वतःहून अजमल यांच्या विरोधात हिंदूंच्या भावना दुखावल्यावरून गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे आणि कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !