वेदांचे महत्त्व जगात पोचवणारे ब्राझिलचे जोनास मसेटी उपाख्य ‘विश्‍वनाथ’ !

पंतप्रधान मोदी यांनी केले ‘मन की बात’मध्ये कौतुक !

  • विदेशी अन्य धर्मीय नागरिक भारतात येऊन वेदांचे शिक्षण घेऊन नंतर त्याचा जगभरात प्रसार करतो, ही स्वधर्माविषयी अज्ञानी हिंदूंना चपराकच होय !
  • पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करत स्वतःच्या महान धर्माकडे दुर्लक्ष करणारे हिंदु पाश्‍चात्त्यांकडूनच आता हिंदु धर्माचा प्रसार होत असल्यानंतर आतातरी जागे होतील का ?
डावीकडून जोनास मसेटी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमामध्ये ब्राझिलच्या जोनास मसेटी यांच्याविषयी विशेष माहिती दिली होती. मसेटी यांनी भारतात ४ वर्षांचा कालावधी घालवल्यानंतर ते तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वेदांचे महत्त्व जगापर्यंत पोचवण्याचे काम करत आहेत.

१. या कार्यक्रमात मोदी म्हणाले की, काही लोक भारतीय संस्कृती, शास्त्र, पुराणे आणि वेद यांच्या शोधात भारतात आले आणि जीवनभर इथलेच झाले, तर काही भारताचे सांस्कृतिक राजदूत म्हणून त्यांच्या देशात परतले. मला जोनास मसेटी यांच्या कार्याविषयी समजले, त्यांना ‘विश्‍वनाथ’ही म्हटले जाते. ते ब्राझिलमध्ये श्रीमद्भगवद्गीता आणि वेद यांचे शिक्षण देतात.

२. मसेटी जोनास यांनी मॅकेनिकल इंजिनीयरींगची पदवी घेतल्यानंतर ते एका आस्थापनामध्ये काम करत होते; पण त्यानंतर त्यांचा रस भारतीय संस्कृती आणि वेद यांमध्ये निर्माण होत गेला. त्यांनी तमिळनाडूच्या कोइम्बतुर येथील अर्श विद्या गुरुकुलम्मध्ये ४ वर्षे वेदांचे शिक्षण घेतले. त्यांनी पूर्णवेळ अध्यात्मासाठी देण्याचा निर्णय घेतला. ते ब्राझिलमध्ये विश्‍वविद्या नावाची संघटना चालवत आहेत. ऑनलाईन कोर्सद्वारे गेल्या ७ वर्षांमध्ये जोनास लाखो जणांना वेदांचे शिक्षण देत आहेत. ट्विटर आणि इंस्टाग्राम यांवरही त्यांचे ३४ सहस्रांहून अधिक फॉलोअर्स असून तिथेही ते भारतीय संस्कृतीचे आणि वेदांचे धडे देत असतात. जोनस यांच्या या प्रवासाला पंतप्रधान मोदी यांनी अनुकरणीय म्हटले आहे.