वाराणसी येथे पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत देवदिवाळी साजरी

१५ लाखांहून अधिक लावण्यात आले दीप !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ३० नोव्हेंबरच्या सायंकाळी काशीच्या राजघाटवर देवदिवाळी साजरी करण्यात आली. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आल्यानंतर येथील ८४ घाटांवर १५ लाखांहून अधिक दीप प्रज्वलित करण्यात आले. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रम आणि ‘लेझर शो’ आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान मोदी यांच्या समवेत राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही या मंगलप्रसंगी उपस्थित होते.


तत्पूर्वी पंतप्रधानांनी काशी विश्‍वनाथ मंदिरात जाऊन पूजा केली. तसेच येथील काशी विश्‍वनाथ कॉरिडोरच्या कामाची पाहणी केली. दुपारी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वाराणसी ते प्रयागराज या ७३ किलोमीटर सहापदरी राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटनही करण्यात आले.