‘गझवा-ए-हिंद’ कि हिंदु राष्ट्र ?

जिहादी मानसिकता बाळगून आतंकवादाचे समर्थन करणार्‍या संघटनेवर बंदी घातल्याने ‘इस्लामी कट्टरतावादाला धक्का लागण्यास काही प्रमाणात प्रारंभ झाला आहे’, असे म्हणता येईल; पण याची पाळेमुळे दूरवर पसरलेली आहेत. मुळात आतंकवाद्यांना भारतात ‘गझवा-ए-हिंद’ आणायचे आहे.

सांस्कृतिक प्रसाराचे सूर !

एकीकडे श्री सरस्वतीदेवीच्या वीणेला सन्मानित करत असतांना महाराष्ट्रातील करंटे नेते मात्र ‘तिचे चित्रही शाळांमध्ये नको’, अशी बौद्धिक दिवाळखोरी व्यक्त करत आहेत. त्यांच्या विरोधामुळे देवी सरस्वतीचे चित्र शाळेतून हटणार नाहीच; उलट कालगतीनुसार वैश्विक स्तरावर तिचा जयजयकार होईल, हा या भव्य वीणेचा संदेश आहे !

आतंकवादी प्रवृत्ती ठेचा !

आताच्या आधुनिक युगात आतंकवाद्यांचे आव्हान हे केवळ बाह्यतः राहिलेले नाही, तर सामाजिक माध्यमांद्वारे बौद्धिकतेपर्यंत त्याच्या कक्षा रूंदावल्या आहेत. मिळेल त्या माध्यमातून आतंकवादी त्यांच्या कारवाया करत असतात. यासाठी बंदी घालायची असेल, तर केवळ संघटनेवर न घालता त्यांच्या सामाजिक माध्यमांच्या खात्यांवरही घातली पाहिजे.

हिजाब आंदोलन !

जगभरातील हिजाबविरोधी आंदोलनातून भारतातील धर्मांध मुसलमान धडा घेणार का ? हिजाबची बळजोरी करणार्‍या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घालण्याची वेळ भारत सरकारने आणली आहे; परंतु हिजाबवर बंदी घालण्याचा विचार भारतातील मुसलमान करतील, अशी आशा करणे व्यर्थ आहे !

अमेरिकेला सडेतोड !

भारताने अमेरिकेला सुनावणे, ही भारताच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढलेल्या शक्तीचे दर्शक ! पाक कधीही दिवाळखोर होण्याची शक्यता आहे. त्याच्यावर आता शेवटचा प्रहार करण्याची स्थिती निर्माण होत आहे. ही संधी भारताने साधावी आणि पाक नावाचा प्रश्न कायमचा सोडवावा !

‘पुरुषोत्तम’ उत्तमच हवा !

समोर काहीतरी आव्हान, अवघड प्रश्न असले, तरच विद्यार्थी घडणार ना ? शिकणार ना ? अशा स्थितीत चांगले नाटक नसल्याने पुरुषोत्तम करंडक नाकारून परीक्षकांनी चांगला आणि योग्य पायंडा पाडला आहे. यातून विद्यार्थी अंतर्मुख होऊन अधिक जोमाने प्रयत्न करतील, ही अपेक्षा !

आत्मोद्धारक भगवद्गीता अनुसरा !

संपूर्ण भारतातील शाळांमध्ये गीतेचा अभ्यासक्रमात समावेश होण्यासाठी प्रयत्न करायला हवा. विद्यार्थ्यांनीही गीतेचा सखोल अभ्यास करून जीवनाचे सार्थक करून घ्यावे. जेव्हा हे शक्य होईल, तो दिवस गीतेसाठी विजयदिन ठरेल ! हे साध्य होण्यासाठी गीतेची अमृतगाथा उलगडणार्‍या भगवान श्रीकृष्णालाच शरण जाऊया !

मद्य प्रोत्साहन विभाग !

‘आज शेतकर्‍यांची दुःस्थिती का निर्माण झाली ?’ वास्तविक सरकारने भारतभरात मद्यावर बंदी आणण्याचा निर्णय घेणे सामान्य नागरिकाला अपेक्षित आहे. सरकारी तिजोरीत पैसे आणण्याचे आणि शेतकर्‍यांना आर्थिक लाभ मिळवून देण्याचे मार्ग अनेक आहेत. ते सरकारने चोखाळावेत, अशीच जनतेची अपेक्षा !

हिंदूंसाठी असुरक्षित इंग्लंड !

भारत सरकार हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांच्या संदर्भात एकतर निषेध नोंदवत नाही आणि नोंदवला, तर तो मुळमुळीत असतो. परिणामी तेथील हिंदूंचे जीवन असुरक्षित झाले आहे. ही परिस्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी एकीने रहाणे आणि भारतीय वकिलातीवर, भारत सरकारवर सातत्याने दबाव टाकणे आवश्यक आहे !